*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*“मराठी भाषा अभिजात”*
मराठी साहित्याचा आम्हा आहे अभिमान
प्राचीन भाषेला लाभला अभिजात बहुमानIIधृII
गाथा सप्तशती दोन हजार वर्षापूर्वीचा ग्रंथ
वाचताना अभिमानाने उर मन येई भरून
पंचवीसशे वर्षापासून रुळली अभिजातII1II
संस्कृत भाषेचे केले मराठी भाषांतर
ज्ञानोबानी सर्वांसाठी घेतले कष्ट अपार
भाषा राखी आदर सर्वांना घेई सांभाळूनII2II
माऊली शिरोमणी जाहले भाषेचे राणीव
राजस शब्द मराठीचे दैवत वैभव
छत्रपतींनी कारभार चालवला मराठीतII3II
अगणित क्रांतिकारक जाहले मराठीत
प्राणांची बाजी लावली तेवते स्वातंत्र्य ज्योत
असंख्य स्वातंत्र्यवीरांनी केले बलिदानII4II
कवी मुकुंदराज रामदास सोपान ज्ञानदेव
एकनाथ तुकाराम गोरोबा जनी नामदेव
ऋण संतांचे मानूया स्मरुनी योगदानII5II
अभंग गवळण ओवी पदे दिंड्या भारुडे
रूपक साकी सुभाषित लावणी पोवाडे
आर्या विराणी गोंधळ कीर्तन मराठी भूषणII6II
विश्वातील दशम स्थानांवर ज्ञात श्रीमंत
अमृता ते पैजा जिंकणारी अमृताहुनी गोड
माधुर्ये ओजस मराठी भावपूर्ण प्रसादII7II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.CeII9373811677.