*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कॅमेर्यासोबतचं जगणं माझं…!!*
अठ्ठावीसावे !!
सारेच चेहरे ओळखीचे
कॅम-याने जपले नाही
नाती तपासून बघावी
कधीचं वाटलं नाही..
सारेच शहर माझे
कॅमे-याला परिचयाचे आहे
घर…कुणाचे कां असेना
ते…माझ्या कॅमेर्यासोबत आहे..
सा-याचं बागा शहराच्या
त्या माझ्याचं आहेतं
नाव…कोणाचे कां असेना
कॅमे-याने सजवल्या आहेतं..
शहर माझे पाट्यांचे
अस्मिता इथल्या माणसांची
काही चमकलेत..काही विझलेत
कॅमे-याने ..जपली आठवण त्यांची
जन्मलो नाही या….शहरात
जायचे इथेचं आहे
कुणी असो..नसो..सोबतीला
कॅमे-याला..वैकुंठ ठाऊक आहे..!!
बाबा ठाकूर.