पुनावळे, पुनावळे बाजार पुणे-
नवरात्री निमित्त अनिका पिकाडेली सोसायटी पुनावळे, पुनावळे बाजार येथे भजनाचा कार्यक्रम अनिका भजनी मंडळाने प्रथमच आयोजित केला होता.
सौ. माधुरी वैद्य कुमठेकर यांनी आपला पूर्वानुभव वापरून ,पुढाकार घेऊन समविचारी,धार्मिक महिलांना एकत्र आणून भजनी मंडळ स्थापन केले.
याप्रसंगी वेगवेगळ्या देवतांची पुढील भजने सुरेल रित्या गायली गेली.
श्री गणेशा शंकर सूत गौरी नंदना, उमा शंकरा सदा स्मरा, येई अंबे भजनाला धावून ये, पैंजणांचा नाद आला गोड कानी ग, सोन्याचे डोरले गळ्यात काळे मणी, चांदण चांदण झाली रात, काय सांगू, कसं सांगू याबरोबरच देवीची काही हिंदी भजने गायली गेली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ सारीका पाटील यांनी उत्तमरित्या केले.
साऊंड सिस्टीम,माईक ची व्यवस्था इंजि.सौ पुजा कुमठेकर, डॉक्टर साईप्रसाद, तसेच सोसायटी चे अध्यक्ष व त्यांचे सहकारी यांनी केली.
पारंपरिक टाळ वाजवून उत्तम साथ सौ कासट ताई तर उमा बेळे व राजश्री पाठारे व सौ पाटील यांनी देवीचे महालक्षमीचे भजन गायले. रुखमीणी आजीनी सुरांत साथ दिली. उपस्थितांनी मंडळाचे कौतुक केले.
नवरात्रीत ज्या मैत्रीणींनी भजनाला बोलावले होते प्रत्येकीच्या घरी भजन सेवा देताना भजनी महिलांचा आनंद द्विगुणित झाला.
नारखेडे ताई, राजश्री ताई, उमा ताई, कासट ताई रुखमीणी आजी यांनी भजनांत उत्तम साथ दिली.
अनिका पिकॅडिली च्या रहिवाशांनी भरपूर उपस्थिती दाखवून प्रोत्साहन दिले.