पर्यटनमंत्री गिरीश महाजन, मंत्री केसरकर यांना करावा लागला वेळागर वासियांच्या रोषाचा सामना – पर्यटनमंत्री गिरीश महाजन
मंत्री केसरकर यांना करावा लागला वेळागर वासियांच्या रोषाचा सामना…
वेंगुर्ला
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या पंचतारांकित हॉटेलचा भव्य उद्घाटन सोहळा आज सायंकाळी वेंगुर्ले तालुक्यातील आरवली वेळागर (शिरोडा) येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची मुख्य उपस्थिती होती. यावेळी वेळागरवासियांनी विरोध दर्शविला. आज शिरोडा येथे आलेले राज्याचे पर्यटन मंत्री मंत्री गिरीश महाजन आणि शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना स्थानिकांचा रोष सहन करावा लागला.
शिरोडा-वेळागर येथील गेली अनेक वर्षे ताज ग्रुपच्या माध्यमातून पंचतारांकित हॉटेल उभारण्यासाठी शासनाने जागा हस्तांतरित केली होती. तेथील ३९ सर्वे नंबर वगळून १४० हेक्टर क्षेत्रात पंचतारांकित हॉटेल उभारावे असे ठरले होते. शासनाने ३९ सर्वे नंबर वगळला पण अजूनही शासनाकडून त्याबाबतचे कोणतेही पत्र प्राप्त झाले नाही. तेथील लोकांनी वस्ती भाग असलेला क्षेत्र वगळून ताज ग्रुपने पंचतारांकित हॉटेल उभारावे असे सूचित केले. परंतु वस्तीत असलेल्या जमिनी सकट क्षेत्र घेऊन पंचतारांकित हॉटेल उभारण्याबाबतचे ताज ग्रुपचे धोरण असून महाविकास आघाडी सरकारच्या काळात ताज ग्रुपचा संपलेला करार माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ९० वर्षाच्या करारावर कर वाढवून दिला हे चुकीचे काम झाले आहे, असे येथील स्थानिकांनी म्हटले आहे. याप्रश्नी राज्याचे पर्यटन मंत्री आणि मुख्यमंत्री यांचे लक्ष वेधून ३९ सर्वे नंबर वगळण्याबाबत तसेच गावठाण क्षेत्रात हा भाग धरला आहे.
यासह ताज ग्रुपला जर दिलेल्या जागेमध्ये पंचतारांकित हॉटेल उभारायचे नसेल तर त्यांनी ती जागा सोडावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केलीय.