You are currently viewing आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात हिंदी दिवस संपन्न

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात हिंदी दिवस संपन्न

*आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात हिंदी दिवस संपन्न*

वैभववाडी

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वैभववाडी येथे दिनांक १९ सप्टेंबर २०२४ रोजी महाविद्यालयातील हिंदी विभाग आणि बँक ऑफ महाराष्ट्र वैभववाडी शाखेच्या संयुक्त विद्यमाने हिंदी दिवस संपन्न झाला. हिंदी विभागाच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय हिंदी निबंध लेखन स्पर्धेमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार बँक प्रबंधक मा.जयदेव कुमार व स्थानिक समितीचे अध्यक्ष सज्जनकाका रावराणे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जयदेव कुमार यांनी हिंदी भाषेचे महत्त्व आणि जीवनामध्ये करिअर संदर्भात कशा पद्धतीने सतर्क राहिले पाहिजे व स्पर्धेच्या युगामध्ये कसे टिकून राहिले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर मा. सज्जनकाका रावराणे यांनी हिंदी दिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करत आज दिशाहीन होणाऱ्या तरुणांनी आपल्या जीवनाविषयी सकारात्मक विचार केला पाहिजे असे सांगितले.
या कार्यक्रमांमध्ये प्रथम क्रमांक फिजा उमर काझी (आचरा महाविद्यालय), द्वितीय क्रमांक तुषार पार्टे (वैभववाडी महाविद्यालय), तृतीय क्रमांक प्रीती चव्हाण (तळेरे महाविद्यालय) यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रबंधक मा.जयदेव कुमार, महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था स्थानिक समितीचे अध्यक्ष मा. सज्जनकाका रावराणे, डॉ एन. व्ही. गवळी, IQAC समन्वयक डॉ. डी. एम. सिरसट, हिंदी विभाग प्रमुख प्रा.ए. एम. कांबळे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ए. एम. कांबळे यांनी केले, तर आभार आणि निवेदन प्रा.एन. ए. कारेकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा