मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून सावंतवाडी शहरातील विकास कामांचे थाटात भूमिपूजन…!
मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत मंजूर: बाबू कुडतरकरांकडून स्थानिक ग्रामस्थांना दिला भूमिपूजनाचा मान..
सावंतवाडी :
शहरातील आमदार तथा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे मंजूर करण्यात आले आहेत. या कामांचे भूमिपूजन सोहळे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून श्रीफळ वाढवून भूमिपूजन केली जात आहेत. यावेळी शिंदे शिवसेनेचे शहर प्रमुख बाबू कुडतरकर यांनी प्रत्येक प्रभागात स्थानिक नागरिकांचा सन्मान करत विकास कामांचे भूमिपूजन करण्याचा मान दिला.
सावंतवाडीचे आमदार तथा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर झालेली विकास कामे पुढीलप्रमाणे – १) सावंतवाडी नगर परिषदेच्या मोती तलाव येथे रंगीत कारंजा आणि लेझर शो काम करणे. २) सावंतवाडी नगर परिषदेच्या मोती तलाव येथे रंगीत कारंजा आणि लेझर शो साठी २०० के व्हिए ट्रान्सफॉर्मर पुरवून बसवणे. ३) मोती तलाव जलक्रीडा केंद्रासाठी स्वॉन पेडल बोट, मोटार बोट. स्कूटरबोट, जेटी वगैरे अनुषंगिक साहित्य खरेदी करणे. ४) गांधी चौक सुशोभिकरण करणे. ५) उभाबाजार येथील भिसे उद्यान दर्जावाढ करणे. ६) पांजरवाडा रस्ता स्वामी समर्थ अपार्टमेंट ते होली क्रॉस चर्च पर्यंत गटार बांधकाम करून बंदिस्त करणे. ७) जुम्मा मशीद जवळ मठकर घर ते अस्लम खान (शिरोडकर) घराजवळील पाणंद मजबुतीकरण करणे. ८) वैश्यवाडा आकेरकर घरा जवळील संरक्षक भिंत बांधणे. ९) वैश्यवाडा हनुमान मंदिर समोर ओपन जिम बसविणे. १०) वैश्यवाडा गोविंद नाट्यमंदीर समोरील मसुरकर घराकडे जाणारी पाणंद पेवर ब्लॉक बसवणे. ११) सावंतवाडी नगरपरिषदेच्या मालकीच्या आ.क्र.६६ जना फिश व मटण मार्केटसाठी आरक्षित जागेत मटण मौर्केट चे बांधकाम करणे. १२) सावंतवाडी नगरपरिषद हद्दीतील झिरंग विभागातील गोवेकर कॉलनी येथील न. प. च्या मालकीच्या खुल्या जागेत बहउददेशीय इमारत बांधणे. १३) जिमखाना राज्य महामार्गापासून रमाई वस्तीकडे जाणा- या रस्त्याचे डांबरीकरण करणे. १४) मिलाबीस हायस्कूल समोरील जागेत दोन सोलर हायमास्ट बसविणे. १५ ) सालईवाडा आब्लर्ट फनीडीस घराजवळील मोरी दुरुस्त करणे. १६) मेनरोड वृद्धाश्रमा समोरून जाणारा कॉलनी अंतर्गत रस्ता गटार व डांबरीकरण करणे. १७) सावंतवाडी नगरपरिषद हद्दीतील गरड विभागातील कुणकेरकर घरासमोरील न. प. च्या मालकीच्या खुल्या जागेत बहुउद्देशीय इमारत बांधणे. १८) सावंतवाडी नगरपरिषद हद्दीत शिवराम राजे पुतळा उद्यान विकसीत करणे. १९) सावंतवाड़ी कविवर्य वसंत सावंत मागे दोन्ही बाजूने रेनिंग व रस्त्याला पेव्हर ब्लॉक बसविणे. २०) सावंतवाडी नगरपरिषद हद्दीतील नगरपरिषदेच्या जगन्नाथराव भोसले शिवउदयान मधील अॅम्युझमेंट पार्क लगतच्या नाल्याचे बांधकाम करणे. २१) सावंतवाडी नगरपरिषदेच्या ज. जगन्नाथराव भोसले उद्यानातील नाल्याचे बांधकाम करणे.२२) सावंतवाडी नगरपरिषदेच्या ज. जगन्नाथराव भोसले उदयानामध्ये गांडूळ खत प्रक्रिया केंद्रासाठी शेडचे बांधकाम करणे. २३) सावंतवाडी नगरपरिषदेच्या ज. जगन्नाथराव औसले उदयानामध्ये नर्सरीसाठी शेडचे बांधकाम करणे. २४) ज. जगन्नाथराव भोसले उदयानामध्ये सोलर हायमास्ट बसविणे.अशी विकास कामे सावंतवाडीचे आमदार तथा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याने मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे सावंतवाडी शहरात आता विकासाची गंगा वाहणार आहे.