You are currently viewing ओटवणे रवळनाथ मंदिर येथील प्रशस्त मंडपाचा लोकार्पण सोहळा उत्साहात

ओटवणे रवळनाथ मंदिर येथील प्रशस्त मंडपाचा लोकार्पण सोहळा उत्साहात

ओटवणे रवळनाथ मंदिर येथील प्रशस्त मंडपाचा लोकार्पण सोहळा उत्साहात

भाजपा युवा नेते विशाल परब यांचे देवस्थानच्या मानकऱ्यांनी मानले आभार

भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी ओटवणे रवळनाथ मंदिर येथे भाविकांच्या सोयीसाठी स्वखर्चाने बांधून दिलेल्या प्रशस्त मंडपाचे लोकार्पण दसऱ्याच्या सुवर्ण पर्वणीला शुक्रवारी या देवस्थानचे सर्व मानकरी आणि विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी स्थानिक देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रवींद्र गावकर, सचिव रमेश गावकर, सरपंच आत्माराम गावकर, माजी उपसरपंच बाबाजी गावकर, देवस्थानचे मानकरी अण्णा मळेकर, दत्ताराम गावकर, नारायण गावकर, बाबा मळेकर, प्रथमेश गावकर,भाजपा शक्ती केंद्रप्रमुख ओंकार पावसकर, विषाल फाऊंडेशनचे श्रीकांत राजाध्यक्ष, साई भोई, श्रेयस परब, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.
गेल्या या देवस्थानच्या दसरोत्सवाला वर्षी विशाल परब आले असता देवस्थानच्या मानकऱ्यांनी मंदिर परिसरात मंडप उभारण्याबाबत त्यांचे लक्ष वेधले होते. त्यावेळी उन्हाळ्यात तसेच पावसाळ्यात भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर परिसरात मंडप उभारण्याची ग्वाही विशाल परब यांनी दिली होती. त्याप्रमाणे विशाल परब यांनी स्वखर्चाने प्रशस्त मंडप बांधून दिला. रवळनाथ मंदिर नजिकच्या ऐतिहासिक नगारखाना आणि भक्तनिवास याला लागूनच हा प्रशस्त मंडप साकारण्यात आला आहे. कारीवडेचे महेश गावकर आणि ओटवणेचे बाळा गावकर व गावातील इतर कारागिरांनी हा प्रशस्त मंडप साकारला.
जागृत देवस्थान तसेच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रवळनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची नेहमीच गर्दी असते. तसेच या देवस्थानच्या सर्व धार्मिक उत्सवांना भाविकांची अलोट असते. मंदिर परिसरात मंडप नसल्यामुळे या देवस्थानच्या धार्मिक उत्सवात पावसाळ्यात तसेच उन्हाळ्यात भाविकांची गैरसोय होत होती. या मंडपामुळे या देवस्थानच्या धार्मिक उत्सवात मंदिर परिसरात मंडप अभावी होणारी गैरसोय दूर होणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी मंडप बांधून दिल्याबद्दल देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रवींद्र गावकर आणि देवस्थानचे सर्व मानकऱ्यांनी विशाल परब यांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा