You are currently viewing वझरे येथील मोठ्या पुलाचे भूमिपूजन दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तालुका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उत्साहात संपन्न

वझरे येथील मोठ्या पुलाचे भूमिपूजन दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तालुका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उत्साहात संपन्न

वझरे येथील मोठ्या पुलाचे भूमिपूजन दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तालुका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उत्साहात संपन्न

दोडामार्ग – वार्ताहर

वझरे येथील मोठ्या पुलाचे भूमिपूजन दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तालुका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. या पुलासाठी २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाच्या बजेटमधून मंजूर करण्यात आला.

यावेळी बोलताना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस म्हणाले की, राज्य शासनाच्या बजेट मधून हा निधी मंजूर करण्यात आला असून हा निधी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या शिफारशीनुसार मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीच्या सरकारमुळे भरघोस निधी तालुक्यासाठी दिला आहे. या कामांशिवाय अन्यही अनेक कामासाठी आमच्या महायुतीच्या सरकारने तालुक्यातील विकास कामासाठी निधी दिला आहे. येत्या काळात तालुक्याचा विकासकामांतून कायापालट मंत्री दीपक केसरकर करणार आहेत असेही श्री. गवस यावेळी म्हणाले.

[ आंबडगाव पुलाचेही भूमिपूजन ]
आंबडगाव गावठाणात देऊळवाडी जोड रस्त्यावरील पुलाचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले. याही पुलाच्या कामासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी भाजपचे माजी उपजिल्हाध्यक्ष चंदू मळीक, शिवसेना उपतालुकाप्रमुख मायकल लोबो, विभागप्रमुख हर्षद सावंत, अमर राणे, लाडू आयनोडकर, सरपंच अनिल शेटकर, वझरे सरपंच सुरेश गवस, आंबडगाव सरपंच शेजल गवस, नीरज पांचोली, चंद्रकांत जाधव, बाळू गवस, कांता गवस, चंद्रकांत शिरोडकर, दशरथ गवस, फटी गवस, श्रीकांत गवस, बाबी गुरव, साबा गवस, लक्ष्मण गवस, यांसह भाजप शिवसेना पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा