You are currently viewing उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामार्फत वेंगुर्ले तालुक्यात अणसुर ग्रामपंचायत मध्ये वैद्यकीय शिबिराचे आयोजन

उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामार्फत वेंगुर्ले तालुक्यात अणसुर ग्रामपंचायत मध्ये वैद्यकीय शिबिराचे आयोजन

*उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामार्फत वेंगुर्ले तालुक्यात अणसुर ग्रामपंचायत मध्ये वैद्यकीय शिबिराचे आयोजन*

*एस्.एस.पी.एम. मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाईम हाॅस्पिटल , पडवे च्या डाॅक्टरांचे सहकार्य*

*दिनांक -11-10-2024 रोजी अणसूर ग्रामपंचायत येथे उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामार्फत sspm मेडिकल कॉलेज, लाईफटाईम हॉस्पिटल पडवे यांच्या सहकार्यातून ग्रामपंचायत अणसूर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या शिबिराचे उदघाटन सातेरी देवस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत गावडे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून व दिपप्रज्वल करण्यात आले, यावेळी बिटू गावडे, चंदू गावडे, प्रभाकर गावडे, सुनील गावडे,राजन गावडे, भास्कर गावडे, गणेश गावडे, तसेच ग्रामपंचायत सरपंच, सत्यविजय गावडे , उपसरपंच वैभवी मालवणकर, सदस्य साक्षी गावडे, संयमी गावडे, प्रज्ञा गावडे, या सर्वांच्या हस्ते दिपप्रज्वल करून शिबिराला सुरवात करण्यात आली.
यावेळी सरपंच सत्यविजय गावडे यांनी शिबिरातील उपस्थित डॉक्टर आणि त्याची पूर्ण टीम यांचा गुलाबपुष्प देऊन स्वागत करुन , उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामार्फत अणसूर सारख्या ग्रामीण भागात वैद्यकीय शिबीर आयोजित करून गोरगरीब जनतेला मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल सरकारचे आभार मानले .
तसेच उपस्थित शिबिरातील सर्व ग्रामस्थ व कार्यकर्ते यांचे उपसरपंच वैभवी मालवणकर यांच्या हस्ते गुलाबपु्प्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला 68 रुग्णांनी सहभाग दर्शवीला, यावेळी सरपंच सत्यविजय गावडे याने उपस्थित सर्वांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा