You are currently viewing संकेश्वर-बांदा रस्ता कोठून न्यावा, हे दिल्लीत ठरणार – श्रीकांत माने

संकेश्वर-बांदा रस्ता कोठून न्यावा, हे दिल्लीत ठरणार – श्रीकांत माने

सावंतवाडी

नव्याने जाहीर करण्यात आलेला संकेश्वर-बांदा हा रस्ता कोठून न्यावा याबाबतचा निर्णय दिल्लीत होणार आहे. तो निर्णय आमच्या अखत्यारीत नाही,अशी भूमिका सावंतवाडी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत माने यांनी मांडली आहे. हा रस्ता आपल्याच बाजूने न्यावा, अशी मागणी सावंतवाडी शहर आणि बावळाट-बांदा पंचक्रोशी अशा दोन्ही बाजूने होत आहे. परंतू यासाठी स्थानिक खासदार-आमदारांची भूमिका आणि पाठपुरावा महत्वाचा ठरणार आहे.
सिंधुदूर्ग जिल्ह्याला घाटमाथ्याशी जोडणाण्यासाठी महत्वाचा ठरणारा संकेश्वर-बांदा हा मार्ग नव्याने मंजूर झाला आहे. हा महामार्ग पुर्वी संकेश्वर रेडी असा जाहीर करण्यात आला होता. मात्र आता तो संकेश्वर-बांदा असा होणार आहे. मात्र संबधित खात्याकडुन करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात यासाठी दोन रस्ते घेण्यात आले आहेत. यात सावंतवाडी शहरातून आणि बावळाट मार्गे असा रस्त्याचा समावेश आहे. मात्र शहराच्या बाहेरून यापुर्वीच मुंबई गोवा महामार्ग गेल्यामुळे कीमान हा रस्ता तरी शहरातून जावा, अशी व्यापार्‍यांसह नागरीकांची मागणी आहे. तर बांदा तसेच बावळाट, दाणोेली परिसराचा विकास होण्यासाठी त्या ठीकाणावरुन हा मार्ग न्यावा, असे तेथिल ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे नेमका कुठच्या मार्गाला पसंती दर्शविली जाते, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. मात्र याबाबत सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता श्री.माने यांच्याशी संपर्क साधला असता याबाबतचा निर्णय हा दिल्लीतून होणार आहे. आमच्या अखत्यारीत काहीच नाही. लोकांची मागणी असेल त्या प्रमाणे स्थानिक आमदार आणि खासदारांनी योग्य तो पाठपुरावा करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा