*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वाटते आताशा…*
आगीशी खेळतांना चटक्यांची पर्वा कशाला
चटकेच घेऊनी मी झोपतो रोज उशाला..
चांदणे नभात असते ते दुरूनी छानच दिसते
किती दूर दूर ते आहे ते भास फुकाचे नुसते…
डोंगर दुरूनी छान पण वास्तवात काय?
साजरे म्हणती बुजुर्ग फसू नको म्हणाली माय..
पकडावे क्षितिज म्हणता मी वाट चालतोच
दमलो किती परंतू हाती न लागले हाय..
रंगही किती परंतू क्षितिजी विरून जाती
बेरंग किती ही दुनिया हातात लागते माती…
सरड्यापरी बदलती ही जात माणसांची
माणूस म्हणावे काय? लज्जा जनास आणती..
लक्तरे अशी चव्हाटी शोभे ना माणसास
लाजेस लाज यावी ही कोणती हो निती?…
कळते पण ना वळते हा शोक जीवनाचा
माणूस म्हणून जगता वाटते आताशा भीती…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

