You are currently viewing विजयदुर्ग-तरेळे रस्ता हा पुढील पन्नास वर्षाच्या विकासाचा राजमार्ग ठरेल – आम. नितेश राणे

विजयदुर्ग-तरेळे रस्ता हा पुढील पन्नास वर्षाच्या विकासाचा राजमार्ग ठरेल – आम. नितेश राणे

*आमदार नितेश राणे यांची विरोधकांवर  टीका*

 

कणकवली

जिथे जिथे सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकास कामे होतात तेथे तेथे आमच्या विरोधातील कावळे टोचा मारायला येतात. विरोधी पक्षाकडे पार्टी फंड नसल्यामुळे त्यांची आंदोलने हल्ली वाढलेली आहेत आणि त्यामुळेच विकास कामांना विरोध वाढलाय. काहींचा तर उदरनिर्वाह हीच विकास कामे अडवून चालतो. मात्र असला विरोध यापुढे खपवून घेतला जाणार नाही. मात्र चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणुसकीचा धर्म आहे. आणि हे संस्कार भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आहेत. ते गुण विरोधकांनी आत्मसात करावे. अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी विरोधकांना सुनावले.

विजयदुर्ग, पडेल, वाघोटण तरेळे या रस्त्यासाठी 417 कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला.त्याचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाले. तर बांधकाम विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी ऑनलाइन पद्धतीने या उद्घाटन सोहळ्यात सहभाग घेतला. यावेळी आमदार नितेश राणे बोलत होते.

ते म्हणाले, कणकवली व देवगड तालुक्यातील विजयदुर्ग – तळेरे रस्ता हा दर्जेदार करण्याची सर्व जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वीकारलेली आहे. हा रस्ता विकासाचा महामार्ग आहे. आर्थिक प्रगतीचा राज मार्ग आहे. ही होणारी विकास कामे म्हणजे दिवाळी आधीची दिवाळी आहे. रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि या रस्त्यांवरून जाताना जो त्रास होतो याची दखल घेऊन या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळवली. यासाठी अथक प्रयत्न करावे लागले.

हा रस्ता होत असताना सर्वांनी सहकार्य आणि एकमेकांना मदत करून रस्ता लवकरात लवकर पूर्णत्वास कसा केला जाईल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्याच्या भागातील सरपंचांनी योग्य ती खबरदारी घेऊन रस्ता करणाऱ्या ठेकेदारांना सहकार्य करावे. चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणुसकीचा धर्म आहे. आणि हे चांगले काम करत असताना अनेक अडथळे येतील. मात्र मुद्दामहून कोण अडथळे आणत असेल तर त्याला रोखा वेळ प्रसंगी पोलिसांना थोडा त्रास होईल मात्र कामात दिरंगाई नको. कॉलिटी मेंटल ठेवा वेळेत पेक्षा जास्त काम पूर्ण झाल्या कॉन्ट्रॅक्टरचा जाहीर सत्कार आपण करू. मात्र रस्त्याचा दर्जाही तेवढाच चांगला ठेवा. मी आमदार म्हणून जेव्हा एखाद्या कामासाठी आग्रह धरतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बांधकाम मंत्री आमच्या हक्काच्या आहेत त्यांच्याकडे विनंती करतो तेव्हा ते आम्हाला काम देतात मंजुरी करतात हा हक्क आणि आग्रह तुम्हा जनतेच्या अपेक्षा गरजा लक्षात घेऊनच करत असतो त्यामुळे तरळे विजयदुर्ग रस्त्यामुळे फार मोठा विकासात्मक बदल हे त्या पन्नास वर्षात होणार आहे आणि तो सर्वांच्याच फायद्याचा ठरेल असा विश्वास यावेळी आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. एखादे काम शासनाच्या एडीपी मध्ये मंजूर होऊन येण्यास किती संघर्ष आणि व्यापला असतात हे कार्यकारी अभियंता सर्वगोड माहित आहे तुम्ही अनेक वेळा बघता की तुमच्या आमदाराचा आवाज बसतो ह्या अशा आवाज बसल्यानंतर जर कोणता फायदा झालेला असेल तर एडीपी मध्ये विकास कामे मंजूर झालेले दिसतात असाही असे एक उदाहरण आमदार नितेश राणे यांनी दिले.

यावेळी आमदार नितेश राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे बांधकाम मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा