You are currently viewing देवगड – निपाणी रस्ता हा शाश्वत विकासाचा राजमार्ग ठरेल – आ. नितेश राणे

देवगड – निपाणी रस्ता हा शाश्वत विकासाचा राजमार्ग ठरेल – आ. नितेश राणे

देवगड – निपाणी रस्ता हा शाश्वत विकासाचा राजमार्ग ठरेल – आ. नितेश राणे

*देवगड निपाणी महामार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण कामाचा आ.नितेश राणेंच्या हस्ते शुभारंभ

*अपूर्व उत्साहात,जनता कार्यकर्त्यांच्या हजारोंच्या उपस्थितीत विकासकामांचा झाला शुभारंभ

कणकवली

देवगड निपाणी 66 किलोमीटर लांबीच्या सिमेंट कॉक्रीटीकरण रस्त्याच्या कामासाठी 331 कोटी रुपयांचा निधी मंजुर आहे. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले आहे. हा रस्ता होण्यासाठी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे हट्ट धरला. त्यामुळेच विशेष बाब म्हणून या रस्त्यासाठी मंजुरी मिळाली आहे. मी 8 वर्षे विरोधी पक्षाचा आमदार होतो. आता 2 वर्षे सत्तेची मिळाली. मात्र 10 वर्षातील बॅकलॉग भरुन काढण्यात यशस्वी झालो आहे. देवगड – निपाणी रस्ता हा शाश्वत विकासाचा राजमार्ग ठरेल. त्यातुन घराघरांत आर्थिक समृध्दी निर्माण होईल असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.
नांदगाव तिठा येथे देवगड निपाणी महामार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण कामाचा आ.नितेश राणेंच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी आमदार अजित गोगटे , बाळ खडपे, राजन चिके,मनोज रावराणे, संतोष कानडे, कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघ संयोजक संदीप साटम, कणकवली भाजपचे तालुकाध्यक्ष दिलिप तळेकर, देवगड तालुकाध्यक्ष बंड्या नारकर , भारतीय जनता पार्टी चे कणकवली सरचिटणीस पंढरी वायंगणकर, रविंद्र शेटये , सुरेश सावंत,भाग्यलक्ष्मी साटम ,संजय देसाई, ,नांदगाव सरपंच भाई मोरजकर, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके , कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर,ओटव सरपंच तांबे, कोलोशी सरपंच आचरेकर, तोंडवली सरपंच मनाली गुरव, हर्षदा वाळके, प्रणाली माने, प्रियंका साळसकर, माजी सरपंच सुरेश लोके , उपसरपंच सचिन परब, प्रदिप हरमलकर, महेश लोके यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आ. नितेश राणे म्हणाले , काहीजण टीका करतात,आम्ही विकासकामे कशी आणतो? त्या त्या मंत्र्याकडे कसे काम करतो .आमदरकीची 8 वर्षे विरोधी पक्षात होतो. गेली दोन वर्षात सर्वाधिक निधी कणकवली मतदारसंघात आणला. जिल्ह्यातील अन्य आमदारांची निधी टोटल मारा,माझ्या मतदार संघातील निधीची टोटल मारा सर्वाधिक निधी आणणारा जिल्ह्यातील तुमचा आमदार आहे. महाराष्ट्रातील पहिल्या 5 मतदारसंघांमध्ये आपला मतदार संघ आहे. निवडणुकांमध्ये कणकवलीचा निकाल पाहिला तर , सर्वाधिक मतदान असते. त्यामुळे काम करण्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे देवगड निपाणी रस्त्याचे काम होताना सर्व सरपंचांनी सहकार्य करण्याची गरज आहे. मात्र संबंधित ठेकेदाराने कमीत कमी त्रास देवून रस्ता मार्गी लावावा.
आता गगनबावडा घाटाचा काम सुरु असताना विरोधक बोंब मारताहेत . मात्र रस्ता सुरु झाल्यानंतर विरोधक पहिले धावतील . रस्त्याचे काम करत असताना कोण विरोधात जाईल तर , काम गतीने होण्यासाठी आपण पाठीशी राहिलं पाहिजे. या होणाऱ्या रस्त्यामुळे या भागात पर्यटकांचा ओघ वाढेल तसेच देवगड या महामार्गावर वाढत्या अपघातांनाही आळा बसेल. सुसज्ज होणाऱ्या या रस्त्यामुळे येथील वाहन धारकांतून , जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. ६६ किलोमीटर लांबीचा दुपदरीकरण करणं व महत्वकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन झाल्याने जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.
यावेळी प्रास्ताविक संदीप साटम , सुत्रसंचलन संतोष जाधव , आभार हर्षदा वाळके यांनी मानले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा