शिक्षण मंत्र्यांच्या दारातच एका खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यानचा ठिय्या
सोबत उबाठाचे रुपेश राऊळ, मायकल डिसोझा यांच्यासह पदाधिकारी
सावंतवाडी :
येथील एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या थकीत पगाराचे आणि पीएफचे पैसे मिळावेत, या मागणीसाठी आज सकाळपासून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, तालुका संघटक मायकेल डिसोझा, चंद्रकांत कासार, शब्बीर मणियार तसेच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, माजी पंचायत समिती सभापती पंकज पेडणेकर यांनी सहभागी होत पाठींबा दिला.
एका खासगी कंपनीच्या तब्बल २१० कामगारांचे पगाराचे पैसे संबंधित कंपनीने दिलेले नाहीत. याविरोधात या युवक – युवतींनी दाद मागण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे उंबरे झिजवले. तर काही दिवसांपूर्वी मंत्री केसरकर यांनाही निवेदन देत लक्ष वेधले होते. मात्र अद्यापही त्यांना आपल्या हक्काचे पैसे मिळाले नसल्याने आजपासून थेट मंत्री केसरकरांच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले आहे.