You are currently viewing नवरात्र नववी माळ….

नवरात्र नववी माळ….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री पल्लवी उमेश लिखित अप्रतिम लेख*

 

*नवरात्र नववी माळ….*

 

सर्वमंगल मांगल्ये शिवे सवार्थ साधिके शरण्येत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते||”

 

आजची नववी माळ/ नववे पुष्प…

पतिव्रता ताराला समर्पित..🙏

 

“या देवी सर्वभूतेषु शक्ती-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः||”

 

आज नवरात्राचा नववा दिवस…

आज पंचकन्या पैकी तारा हीचा परीचय आज करून घेणार आहोत..

 

तारा…

 

तारा म्हणजे वानर कुळातील वालीची पत्नी. वानर कुळातील प्रतिष्ठित स्त्री होती. प्रात:स्मरण मध्ये जी स्मरण केली जाते तीच ही तारा..

आहे.

तारा ही देवगुरु बृहस्पतीची नात होती..ती एक अप्सरा होती…अत्यंत देखणी होती.

ब्रह्म पुराण मध्ये एक श्लोक आहे जो प्रसिद्ध आहे.

अहल्या द्रौपदी तारा कुंती मंदोदरी तथा।

पंचकन्या: स्मरेतन्नित्यं महापातकनाशम्॥-

 

या श्लोकातील तारा बद्दल सांगायचे झाले, तर तारा ही किष्किंधा नगरीची राणी होती. समुद्र मंथन मधून प्राप्त झालेली ही एक अप्सरा होती. समुद्र मंथन समयी अनेक मणी निघाले होते, त्यातील एक मणी म्हणजे ही तारा होती. तारा इतकी सुंदर होती ,कि देवता आणि असुर म्हणजे राक्षस तिच्याशी विवाह करायचे म्हणत होते. त्यावेळी तिथे वाली आणि सुषेण त्या समुद्र मंथन वेळी देवतांच्या बाजूने उपस्थित होते. जेंव्हा तारा प्रकट झाली त्यावेळी हे दोघे ही तिच्यावर फिदा झाले..दोघांनाही तिच्याशी लग्न करण्याचा मोह झाला..मग तिथे उपस्थित देवगण आणि राक्षस गण यांनी एकमताने निर्णय दिला, की जो ताराच्या उजव्या अंगाला उभा असेल तो तिचा नवरा असेल. आणि जो डाव्या अंगाला उभा असेल, तो तिचा पिता असेल. उजव्या अंगाला वाली उभा असल्याने तो तिचा पती झाला आणि पिता म्हणून सुषेण याने जबाबदारी घेतली…प्रसिद्ध महाकाव्य रामायण मध्ये हा उल्लेख असल्याचे दिसते, की सुषेण यांना ताराचा पिता मानले जाऊ लागले. आणि तारा ही वाली ची पत्नी झाली.

 

तारा ही अत्यंत तेजस्वी, बुद्धिमानी ,साहसी होती…शिवाय आपल्या पती विषयी अत्यंत कर्तव्यनिष्ठ अशी होती, म्हणून प्रसिद्ध आहे.

 

जेंव्हा वालीला रामाने बाणाने कपटनीतीने मारले, आणि त्याच्या धाकट्या भावाला म्हणजे सुग्रीवाला राज्य देऊन गादी वर बसवले. त्यावेळी तारा अत्यंत दुःखी झाली आणि तिने आपले सारे केस विस्कटून दुःख करत बसली .आपले उर्वरित आयुष्य तिने ब्रह्मचर्य सारखे जगायचे ठरवले होते.पण त्यावेळच्या वानरांच्या प्रचलित प्रथे प्रमाणे पती निधना नंतर ती वालीचा धाकटा भाऊ सुग्रिवची पत्नी बनली. पण वाली जेंव्हा शेवटची घटका मोजत होता, त्यावेळी त्याने सुग्रीव याला जवळ बोलावले..व सांगितले होते, की ज्या ज्या कठीण प्रसंगी निर्णय घ्यायची वेळ येईल,त्या त्या वेळी ताराचे मत विचारात घ्यायला विसरू नको. तिच्या सल्ल्याविना घेतलेला निर्णय तुला भारी पडू शकतो…तर तिचे ही ऐक. अत्यंत बुद्धिमान आहे. रामायणातील लंकापती रावणाच्या भर सभेत रावणाला चेतावणी देणारा सेनापती अंगद हा वाली आणि ताराचा मुलगा होता.अत्यंत शक्तिशाली आणि बुद्धिमान होता.यद्ध प्रसंगी अंगदच्या पराक्रमाने राम ही प्रभावित झाले होते. म्हणजे वालीचे ही तिच्यावरचं प्रेम आणि विश्वास असलेला दिसून येतो.

 

तारा एक अप्सरा होती..पण वालीचा वध हा कपटनीतीने झाला आणि तो वध रामाने केला, हे कळल्यावर ती अत्यंत दुःखी झाली.

तिने रामावर राग धरून अत्यंत क्रोधित होऊन त्यांना शाप दिला.

 

तो शाप म्हणजे भगवान राम आपल्या पत्नीला भेटतील ही..पण परत ते आपल्या पत्नी पासून दुरावतील.त्यांना पत्नीचे सुख नाही मिळणार.आणि एवढेच नाही तर अजून एक शाप दिला की पुढल्या जन्मी रामाचा मृत्यू हा माझ्या पतीच्या हातूनच होईल…

 

यावरून तारा किती संतापलेली आणि दुःखी झाली असेल, हे समजून घेऊ शकतो आपण.

तसेच आपल्या पती वालिवर तिचे असलेले नितांत प्रेम ही दिसून येते. भविष्यात ताराचे हे शाप सत्यात उतरले……ते असे..

 

आपण पाहिले की रामाने रावणाशी युद्ध करून सीता मिळवली…पण एका धोब्याच्या बोलण्यावरून त्यांनी सीतेचा त्याग केला…त्यांना ती कायमची दुरावली.

तसेच रामाचा पुढील जन्म कृष्णाचा होता…आणि कृष्णाला एका जरा नावाचा भिल्लाच्या बाणांनी त्याचा मृत्यू झाला..तो जरा नावाचा भिल्ल म्हणजेच मागील जन्माचा वानर वाली होता….अशी रामायण मध्ये नोंद सापडते.

 

अशी ही पंचकन्या मधील दुसरे स्थान मिळवलेली वानर स्त्री तारा खरेच खूप आदर्श पतिव्रता होती. त्याकाळच्या प्रथे प्रमाणे नंतर ती सुग्रिवाची पट्टराणी झाली . तरी ती त्याला ही प्रामाणिक राहून ,रामाला सुग्रिवा बरोबर साथ द्यायला खंबीर पणाने युद्धला उभी होती. आपले कर्तव्य तिने उत्तम प्रमाणे निभावलेली ती एक कर्तृत्ववान स्त्री होती.

 

आज घडीला आपण राग मनात ठेऊन बदला घेण्याची भूमिका घेतो.पण तसे न करता कर्तव्य प्रथम हा विचार तिने केला. धर्माच्या बाजूने साथ दिली.आणि एक पतिव्रता स्त्री रावणाने पळवली, तिच्या रक्षणासाठी ती मदतीला ही आली…आणि रामायणात हेच तिचे मोठेपण तिला मोठे बनवते…

अशा वानर स्त्रीला नवरात्र निमित्ताने माझा मानाचा मुजरा..

………………………………………………..

©पल्लवी उमेश

जयसिंगपूर

11/10/2024

प्रतिक्रिया व्यक्त करा