You are currently viewing जांभळा रंग

जांभळा रंग

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम नवरात्र विशेष काव्यरचना*

 

*९) जांभळा रंग*

 

मूळरंग नसला तरीही

मिश्र होता लाल+निळा

एकरूप होता दिसतो

विविध छटांचा जांभळा

 

मोहक, जांभळी गवतफुले

हरित तृणपात्यांवरती

गोकर्ण, नि कृष्णकमळ

वेल सौंदर्य वाढविती

 

फळे जांभळी तरुतळी

रसरशीत, पिकलेली

दुर्मिळ होई रानमेवा

जपु स्वदेशी वृक्षवल्ली

 

तानापिहिनिपाजा मध्ये

जांभळ्या रंगाला स्थान

नभोमंडपी शोभून दिसते

सप्तरंगांची कमान

 

संध्या समयी नभांगणी

मुक्तहस्ते कुंचला फिरतो

विविध रंगी फटकाऱ्यातील

रंग जांभळा किती खुलतो

 

गर्द जांभळ्या शालूवरती

खुलती बुट्टे जरतारी

नववधुच्या नयनांमधली

जणू स्वप्नं भासती सोनेरी

 

बहुप्रतिक्षित जांभळी कारवी

अनुभवण्याचा सुंदर मोका

प्रसिद्धी होता भय वाटे

होईल अस्तित्वालाच धोका

 

 

@भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

११-१०-२४

bharati.raibagkar@gmail.com

 

©®या कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत आपल्याला कविता आवडल्यास नावासह नक्की लाईक आणि शेअर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा