You are currently viewing बांदा-दाणोली राज्यमार्गाचे उद्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन…

बांदा-दाणोली राज्यमार्गाचे उद्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन…

बांदा-दाणोली राज्यमार्गाचे उद्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन…

१२८ कोटीचा निधी होणार खर्च; क्रॉक्रिटचा असलेला रस्ता पर्यटक व स्थानिकांना फायद्याचा ठरणार…

सावंतवाडी

कोल्हापुर आंबोलीवरुन गोव्याला जाणार्‍या पर्यटकांना जवळचा ठरणारा तालुक्यातील बांदा ते दाणोली या राज्यमार्गाचे भूमिपुजन उद्या ऑनलाईन पध्दतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या रस्त्यासाठी १२८ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा रस्ता पुर्णतः क्रॉक्रिटचा असून दोन्ही बाजूने सात मिटरचा असणार आहे. त्यामुळे याचा फायदा पर्यटनासमवेत स्थानिकांना होणार आहे. उद्या सकाळी ११ वाजता फॅट मालवणी हॉटेल समोर, सातुळी येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या रस्ता कामाच्या शुभारंभावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार नारायण राणे, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्‍वर म्‍हात्रे, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे यांच्यासह बांधकामच्या अतिरिक्‍त मुख्य सचिव मनीषा म्‍हैसकर, सचिव सदाशिव साळुंखे, जिल्‍हाधिकारी अनिल पाटील, मुख्य अभियंता शरद राजभोग आदी उपस्थित राहणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा