You are currently viewing सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात स्टेट्स वॉर सुरु…

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात स्टेट्स वॉर सुरु…

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात स्टेट्स वॉर सुरु…

ओळखा पाहू, सावंतवाडीतील ‘ते’ महान नेते जे ६ महिने जेलमध्ये राहिले” कोण..?: केसरकर समर्थकांचे स्टेटस चर्चेत..

सावंतवाडी:

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात स्टेट्स वॉर सुरु झाला आहे. माजी आमदार राजन तेली यांनी ठेवलेल्या स्टेटस नंतर केसरकर समर्थक शिवसैनिकांकडून देखील पोस्टर व्हायरल केलं जातं आहे.

यामध्ये ”ओळखा पाहू, सावंतवाडीतील ‘ते’ महान नेते जे ६ महिने जेलमध्ये राहिले” असा आशय लिहीला आहे. आता हे पोस्टर नेमकं कोणासाठी आहे ? हा आशय नेमका कोणासाठी आहे ? अन् केसरकर समर्थक शिवसैनिक तो का शेअर करत आहेत ? याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. एकीकडे ‘बॅनर बाबां’ची बॅनरबाजी सुरू असताना दुसरीकडे ‘स्टेटस बॉय’ निर्माण होताना दिसत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा