You are currently viewing बांदा-वाफोली रस्ता सुरळीत करा अन्यथा रास्ता रोको

बांदा-वाफोली रस्ता सुरळीत करा अन्यथा रास्ता रोको

*बांदा-वाफोली रस्ता सुरळीत करा अन्यथा रास्ता रोको*

*भाजपा पदाधिकाऱ्यांचा इशारा*

बांदा

बांदा-दाणोली मार्गावरील बांदा येथील राष्ट्रीय महामार्ग ते गणपती मंदिर पर्यंतचा रस्ता हा वाहतुकीस पूर्णपणे धोकादायक बनला असून याबाबत समज दिल्यावर तात्पुरती मलमपट्टी केली जाते व थोड्याच दिवसात रस्ता पुन्हा खड्डेमय होतो. याची दखल घेत आज बांदा भाजपा बांदा ग्रामपंचायत वार्ड क्रमांक तीन चे सदस्य प्रशांत बांदेकर, भाजपा पदाधिकारी गुरु कल्याणकर व सामाजिक कार्यकर्ते हेमंत दाभोलकर यांनी सावंतवाडी येथील सार्वजनिक बांधकाम चे उप-कार्यकारी अभियंता सीमा गोवेकर तसेच सार्व. बांधकामचे उप-विभागीय अभियंता विजय चव्हाण यांची भेट घेत निवेदन सादर केले. त्यांनी त्यात म्हटले की, सदर संपूर्ण रस्ता हा खड्डेमय बनला असून वाहतूक करण्यास धोकादायक बनला आहे. तसेच दुचाकी वाहने चालवणे कठीण बनले आहे. या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत आहेत. तसेच शाळकरी मुलांच्या अंगावर चिखलाचे पाणी उडणे तसेच लोकांना मणक्याचे विकार होत आहेत. एवढी या रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे.स्थानिक लोकांना याचा प्रचंड त्रास होतो आहे. तरी आठ दिवसात सदर रस्ता वाहतुकीस योग्य बनवण्याची विनंती करण्यात आली. अन्यथा रास्ता रोको सारखे आंदोलन करू असा इशारा देण्यात आला.

यावेळी उपविभागीय अभियंता चव्हाण यांनी आठ दिवसात रस्ता सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्रशांत बांदेकर, गुरु कल्याणकर,हेमंत दाभोलकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा