*माजी खा.विनायक राऊत यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेमधून मंजूर केलेल्या कामांची भूमिपूजने करण्याचा नारायण राणेंना नैतिक अधिकार नाही- राजू कविटकर*
कणकवली
माजी खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या कामांचे भूमिपूजने विद्यमान खासदार नारायण राणे उद्या शुक्रवारी करणार आहेत. नारायण राणे केंद्रीय उद्योग मंत्री असताना त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही उद्योग आणला नाही हि वस्तुस्थिती आहे. ते उद्योग मंत्री म्हणून अकार्यक्षम ठरल्यानेच नारायण राणेंना मंत्री पदापासून दूर ठेवण्यात आले. राणेंनी आपल्या कार्यकाळात पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत एकही रस्ता मंजूर केलेला नाही. त्यामुळे झाराप रेल्वे स्टेशन ते साळगाव माणगाव रस्ता व एनएच ६६ ते साळगाव मळा सावंतवाडा हुमरस कुवारवाडी रस्ता हे दोन्ही रस्ते माजी खासदार विनायक राऊत यांनी आपल्या कार्यकाळात मंजूर केलेले असून त्यांचे भूमिपूजन करण्याचा नैतिक अधिकार नारायण राणेंना नाही अशी टीका माजी जि. प. सदस्य राजू कविटकर यांनी केली आहे.
मा.खा.विनायक राऊत यांनी कुडाळ तालुक्यातील झाराप रेल्वे स्टेशन ते साळगाव माणगाव रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे या कामासाठी ७ कोटी ६६ लाख रु. व एनएच ६६ ते साळगाव मळा सावंतवाडा हुमरस कुवारवाडी रस्त्यासाठी ३ कोटी ५ लाख रु.मंजूर केले असून त्याची प्रशासकीय मान्यता १२ जानेवारी २०२३ रोजी देण्यात आली तसेच या कामाची निविदा प्रक्रिया १९ जानेवारी २०२४ रोजी झाली आहे. आणि नारायण राणे हे जून २०२४ मध्ये खासदार झाले आहे. त्यामुळे मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामांशी नारायण राणे यांचा काडीमात्राचा संबंध नाही. नारायण राणेंनी काहीच कामे केली नसल्यामुळे त्यांना आता दुसऱ्याने केलेल्या कामांची भूमिपूजने करण्यासाठी केविलवाणी धडपड करावी लागत आहे. यातून ते आपली अकार्यक्षमता सिध्द करत आहेत अशी टीका राजू कविटकर यांनी केली आहे.