You are currently viewing सावंतवाडीतील तरुणाचा मोती तलावात आढळला मृतदेह….

सावंतवाडीतील तरुणाचा मोती तलावात आढळला मृतदेह….

सावंतवाडीतील तरुणाचा मोती तलावात आढळला मृतदेह….

सावंतवाडी

येथील खासकीलवाडा परिसरात राहणाऱ्या युवकाचा आज येथील मोती तलावात मृतदेह आढळून आला. अभी उर्फ विठ्ठल बाळकृष्ण परब (वय २७) असे त्याचे नाव आहे. त्याने आत्महत्या केली असावी, असा नातेवाईकांचा संशय आहे. परंतु त्याने हा प्रकार नेमका का केला? याबाबत पोलीस तपास करीत आहेत. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सावंतवाडी-खासकीलवाडा येथे राहणारा अभी हा गवंडी काम करत होता. तो चांगला कलाकार म्हणून प्रसिद्ध होता. गेले दोन दिवस तो घरात आला नव्हता. आज सकाळी तलावात एक मृतदेह आढळून आल्याची माहिती त्याचे नातेवाईक राजू धारपवार यांना पोलिसांकडून देण्यात आली. यावेळी धारपवार त्या ठिकाणी गेले असता तो मृतदेह अभीचा असल्याचे त्यांना समजले. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अभी हा मनमिळावू होता. त्याचा मित्रपरिवार मोठा होता. कलाकार म्हणून त्याने अनेक सांस्कृतिक कार्यक्रम केले होते. त्याच्या अचानक जाण्यामुळे सावंतवाडी परिसरात व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात वडिल आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा