You are currently viewing कोलगावात आज डबलबारी भजनाचा सामना   

कोलगावात आज डबलबारी भजनाचा सामना  

कोलगावात आज डबलबारी भजनाचा सामना

सावंतवाडी

कोलगाव येथील ओंकार नवरात्रोत्सव मंडळ निरुखे यांच्या मार्फत गुरुवार १०ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता ट्वेंटी ट्वेंटी डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित केला आहे. श्री ठाणेश्वर प्रासादिक भजन मंडळ दिवा चे बुवा स्वप्निल मेस्त्री व श्री भुतेश्वर प्रासादिक भजन मंडळ देवगडचे बुवा संतोष जोईल यांच्यात हा सामना होईल.

बुवा स्वप्निल मेस्त्री यांना निखील पावसकर पखवाज तर भूषण रेडकर तबला साथसंगत करतील. तर बुवा संतोष जोईल यांना अक्षय मेस्त्री पखवाज तर मांगिरीष घाडी तबला साथसंगत करतील. भजनप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ओंकार नवरात्रोत्सव मंडळातर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा