You are currently viewing नवरात्र… आठवे पुष्प / आठवी माळ….

नवरात्र… आठवे पुष्प / आठवी माळ….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री पल्लवी उमेश लिखित अप्रतिम लेख*

 

*नवरात्र…. आठवे पुष्प / आठवी माळ….*

 

“सर्वमंगल मांगल्ये शिवे सवार्थ साधिके शरण्येत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते||”

 

आज पासून मी रामायण मधील पुढील तीन प्रमुख स्त्रियांवर लिहायचं ठरवलं आहे,ज्या प्रातःस्मरणीय आहेत.

ब्रह्म पुराण मध्ये एक श्लोक आहे जो प्रसिद्ध आहे.

अहल्या द्रौपदी तारा कुंती मंदोदरी तथा।

पंचकन्या: स्मरेतन्नित्यं महापातकनाशम्॥-

 

अर्थात अहिल्या (ऋषि गौतम ची पत्नी), द्रौपदी (पांडवांची पत्नी), तारा (वानरराज बाली ची पत्नी), कुंती (पांडु ची पत्नी) आणि मंदोदरी (रावणाची पत्नी)। या पाच स्त्रियांचे नाव आपण जर प्रत्येक दिवशी स्मरण करून घेतले , तर आपली सर्व पापे धुऊन निघतात….असे मानले जाते. या पाच स्त्रिया विवाहित असून ही कुमारी मुलीं प्रमाणे पवित्र मानल्या जातात .

आज आपण यातील रामायणातील अहिल्या या प्रमुख पात्राचा विचार करू….

 

अहिल्या…..

 

हिंदू धर्मात , अहल्या ( संस्कृत : अहल्या ) हिला अहिल्या असेही म्हणतात , ही ऋषी गौतम महर्षींची पत्नी आहे . अनेक हिंदू धर्मग्रंथांमध्ये देवांचा राजा इंद्र याने तिला प्रलोभन दाखविण्याची आख्यायिका, तिच्या पतीचा तिच्या हातून घडलेल्या चुकीसाठी दिलेला शाप आणि देव रामाच्या शापापासून तिची सुटका असे वर्णन केले आहे .

 

‘अहिल्लोधार’ हा शब्द आपल्या खूप परिचयाचा आहे. राम वनवासात असताना वाटेत शापित अहील्येचा शीळा होऊन पडलेल्या त्या दगडाला पाय लागताच…त्या दगडाचे सुंदर स्त्रीत परीवर्तन होते..आणि अहिल्या शाप मुक्त होते.. प्रभू रामांना ती वंदन करते आणि मुक्त होऊन आकाशमार्गे निघून जाते.

 

आता ही अहिल्या आहे तरी कोण हे आपण पाहुयात….

 

ब्रह्मदेवाने सर्वात सुंदर स्त्री म्हणून निर्माण केलेल्या अहील्येचा विवाह तिच्याहून मोठ्या गौतम ऋषी यांच्याशी झाला होता.

 

अहिल्या दिसायला सुंदर रूपवती अशी असल्याचे दाखले बघायला मिळतात.

 

तिच्या सौंदर्याने इंद्रदेव ही घायाळ झाले. ती एक पतिव्रता स्त्री असल्याने ती बधणार नाही हे त्यांनी ओळखले होते . मग एक युक्ती केली त्यांनी…एकदा गौतम ऋषी स्नान करण्यास नदीवर गेले असता, देवराज इंद्राने गौतम ऋषींचे रूप घेऊन झोपडीत प्रवेश केला ..व समागम करण्याची इच्छा व्यक्त केली ..पतिव्रता असल्याने पतीच्या इच्छेला ती कबूल झाली…इकडे गौतम ऋषी स्नान करून येताना त्यांना आपल्याच रुपातील ऋषी झोपडीतून घाईने जाताना दिसले.त्यांनी तपाने ते देवराज इंद्र असल्याचे ताडले…त्यांना प्रचंड संताप आला..इकडे ऋषी पत्नीला ही झालेली गोष्ट लगेच कळली ..पण तिने काही बोलायच्या आतच गौतम ऋषी यांनी तिला शिळा होऊन पडायचा शाप दिला…आणि पुढील काळात काही हजार वर्षांनी ज्यावेळी प्रभू श्रीराम वनवासात येतील, तेंव्हा त्यांच्या पदस्पर्शाने तुझा उद्धार होईल म्हणून उ:शाप ही दिला. त्यावेळी श्रीरामांचा तू आदर स्अटकआर करावास असे वचन ही दिले. अहील्येने जगाला अदृश्य राहून कठोर तपश्चर्या करून प्रायश्चित्त कसे करावे आणि रामाचा आदरातिथ्य करून ती कशी शुद्ध झाली याचे वर्णन आपल्याला रामायणात बघायला मिळते.

 

आज ही अशा दुसऱ्या पुरुषांपासून फसवल्या गेलेल्या अनेक स्त्रिया आपण पहातो. अशा अत्याचारी स्त्रीला , जिचा यात काही गुन्हा असतं नाही ,तिला मात्र सर्वांचा रोष पत्करावा लागतो आज ही. इथे ही शीळा होऊन पडलेली तरी असते,अदृश्य रुपात ..पण आज अशा स्त्री वर कितीतरी वेळा नजरेने , किंवा कोर्टात शब्दांनी अत्याचार होतात तिच्यावर… पुन्हा पुन्हा बलात्कार होत राहतोय . आता प्रत्येक वेळी राम येणार नाहीय…आता प्रत्येक स्त्रीने स्वत:ची काळजी आणि स्वतःचे रक्षण स्वतः करायला शिकले पाहिजे…

एकवेळ शिक्षण कमी घेतले तरी चालेल, पण स्वत:चा बचाव करायचे शिक्षण प्रथम घ्यायलाच हवे…

आज २वय असलेल्या मुलीं पासून ८० वयाच्या स्त्रीला ही सोडले जात नाही.या नराधमांना शिक्षा देण्यासाठी आता एखादी महिषासुर मर्दिनी जन्माला यायलाच हवी…तीच ही वेळ आहे…असे म्हणायला हवे….आजकाल कलकत्ता,बदलापूर,पुणे लातूर या घटना लागोपाठ घडून येत आहेत…यांच्या नांग्या चिरडायला स्त्री शक्तीने एकत्र येणे हीच काळाची गरज आहे…मी तर म्हणते अशा अत्याचार करणाऱ्या पुरुषांना सर्व स्त्रियांनी एकटे गाठून त्यांचे पुरुषत्व पूर्ण निकामी(कलम) करून सोडून द्यायला हवे . खूप पूर्वी ‘जखमी औरत ‘ नावाचा सिनेमा आला होता…त्यात हे दाखवले होते…स्त्री शक्ती आता एकत्र येणे ही काळाची गरज आहे…कोणत्याही रुपात का होईना अशा नराधमांना शिक्षा केली पाहिजे ..कोर्टात तारीख पे तारीख पडत अशी लोक निरढावली जातात.

हीच ती वेळ….

स्त्री शक्तींनी एकत्र यायला हवेच हवे…

‘या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः’

 

ज्यावेळी श्रीराम आश्रमात आले तेंव्हा त्यांनी पाहिले ,की तपश्चर्या मुळे अहिल्या दैदिप्यमान होत आहे..तिला कुणी पाहू शकत नव्हते.तिचे स्वरूप दिव्य होते. श्रीरामांचा तिला पदस्पर्श होताच, गौतम ऋषींच्या शापाचा अंत झाला.अहिल्या आता सर्वांना दिसू लागली .श्रीराम आणि लक्ष्मण दोघांनी तिला पायाला हात लावून विनम्रभावाने नमस्कार केला.नंतर अहील्येला आपल्या पती गौतम यांचे वचन आठवले .आणि तिने श्रीराम व लक्ष्मण यांचे पाद्य,अर्ध्य अर्पण करून त्यांचा आदर सत्कार केला.श्रीरामांनी तिचे आतिथ्य स्वीकारले.

अहील्येने तप:शक्तीने परत विशुद्ध रूप प्राप्त करून घेतले. गौतम ऋषी ही अहिल्येला परत मिळवून सुखी झाले…असे रामायण मध्ये नमूद केलेले दिसते.

अशा पातिव्रत्य स्त्रीला माझा मानाचा मुजरा..

,,………………………………………………©

पल्लवी उमेश

जयसिंगपूर

10/10/24

प्रतिक्रिया व्यक्त करा