You are currently viewing मोदी सेवा महिना या उपक्रमांतर्गत विनामूल्य आरोग्य शिबिर तिरोडा गावात संपन्न 

मोदी सेवा महिना या उपक्रमांतर्गत विनामूल्य आरोग्य शिबिर तिरोडा गावात संपन्न 

मोदी सेवा महिना या उपक्रमांतर्गत विनामूल्य आरोग्य शिबिर तिरोडा गावात संपन्न

वेंगुर्ले

देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 17 सप्टेंबर ते दिनांक 16 ऑक्टोबर या कालावधीत मोदी सेवा महिना हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यानिमित्त रेडकर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर रेडी आयोजित तिरोडा गावात

प्राथमिक शाळा नंबर एक येथे विनामूल्य आरोग्य शिबिर बुधवार दिनांक 9 रोजी सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरास तिरोडा ग्रामपंचायती सरपंच सौ. प्रियांका सावंत, उपसरपंच श्री. संदेश केरकर, माजी सरपंच विश्वनाथ आडारकर उपस्थित होते.

तिरोडा ग्रामपंचात सरपंच, उपसरपंच यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून विनामूल्य आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. रेडकर हॉस्पिटलचे सेक्रेटरी श्री राजेंद्र कांबळे यांनी मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. आरोग्य शिबिरात ग्रामस्थांच्या आरोग्य तपासणी, रक्त तपासणी, इसीजी तपासणी व मोफत औषधांचे वाटप करण्यात येणार आहे असे सांगितले.
सरपंच सौ प्रियांका सावंत यांनी शुभेच्छा देताना सर्व ग्रामस्थांनी आपली आभा व आयुष्यमान भारत कार्ड काढून घ्यावीत, जेणेकरून शासकीय योजनांचा त्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचा लाभ घेता येईल असे आवाहन केले. तिरोडा गावच्या उपसरपंचांनी आजच्या विनामूल्य आरोग्य शिबिराच्या आयोजकांचे कौतुक केले तसेच सर्व ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
उपमुख्यमंत्री विशेष आरोग्य मदत कक्षाकडून विविध आजारांसाठी निर्धन व अत्यल्प उत्पन्न गटातील रुग्णांकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची यावेळी माहिती देण्यात देण्यात आली.
भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडी कडून या शिबिरांच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
या शिबिरामध्ये 72 रुग्णांची आरोग्य तपासणी केली गेली. 29 रुग्णांची रक्त तपासणी आणि 29 लोकांचा ईसीजी काढण्यात आला. गरजू रुग्णांना मोफत औषधे व गोळ्या देण्यात आल्या. रोगाचे निदान झालेल्या रुग्णांना शासकीय योजनांच्या समन्वयातून पुढे मोफत उपचार करण्यात येणार आहेत.
या शिबिरासाठी मळेवाड पी एच सी च्या डॉ. नम्रता लोंढे, डॉ. राकेश खटावकर, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सिद्धी शेट्टी, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन प्रभू आजगावकर, आरोग्यसेविका ज्योत्स्ना नवार, आशा सेविका सुचिता जाधव, मदतनीस सीमाली गवाणकर, हिंद लॅबच्या सौ. दिपाली नाईक, ईसीजी टेक्निशियन जे. जे. कदम, रेडकर हॉस्पिटल स्टाफ उर्मिला तळकर, सलमा, सोनाली नाईक व ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते.
शिबिराच्या शेवटी श्री. राजेंद्र कांबळे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले तसेच या शिबिरात सहभाग घेऊन ते यशस्वी केल्याबद्दल सर्व आरोग्य कर्मचारी वर्गाचे व ग्रामस्थांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा