You are currently viewing तोंडवळी सुरुबन रस्त्याच्या कामाचा वैभव नाईकांच्या हस्ते शुभारंभ

तोंडवळी सुरुबन रस्त्याच्या कामाचा वैभव नाईकांच्या हस्ते शुभारंभ

मालवण :

 

जगभरातील पर्यटक देवबाग तारकर्ली नंतर तोंडवळी तळाशील भागाला पसंती देत आहेत तोंडवळी हे पर्यटनस्थळ म्हणून समोर येत आहे. गेली अनेक वर्षे मागणी होत असलेला आणि पर्यटनाच्या दृष्टिने महत्त्वाचा असलेला तोंडवळी तळाशील सुरुबन जाणारा रस्ता वनविभागाच्या अखत्यारीत येत असल्याने अनेक नियम व जाचक अटींमुळे हा रस्ता अनेक वर्ष प्रलंबित होता. त्यामुळे तळाशील बीच वर येणाऱ्या पर्यटकांना खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करावा लागत होता. ही बाब आमदार वैभव नाईक यांनी गांभीर्याने लक्षात घेऊन शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून वनविभागाच्या अटी व शर्थींची पुर्तता केली. स्वतःच्या आमदार फंडातून या रस्त्यासाठी १८ लाख ९७ हजार रु. निधी मंजूर केला असून आज आ.वैभव नाईक यांच्या हस्ते या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे. गेल्या २५ वर्षात कोणालाही जमले नाही ते आमदार वैभव नाईक यांनी करून दाखवले आहे.

लवकरच या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. तोंडवळी तळाशील सुरुबन रस्ता मंजूर केल्याने येथील ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार असून पर्यटन वाढीस देखील चालना मिळणार आहे. अनेक वर्षांची मागणी पूर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी,माजी बांधकाम सभापती यतीन खोत, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरोसकर,विभागप्रमुख समीर लब्दे,मालवण युवासेना शाखाप्रमुख राजा पेडणेकर,माजी उपसरपंच संजय केळुसकर,आचरा माजी सरपंच मंगेश टेमकर,तोंडवळी सरपंच नेहा तोंडवळकर,उपसरपंच हर्षद पाटील,ग्रामपंचायत सदस्या मानसी चव्हाण,अनन्या पाटील,नाना पाटील,दीपक कांदळकर,दिलीप पुजारे, महेश चव्हाण,मिलिंद वायंगणकर, दिक्षा गोलतकर,बंटी गोलतकर, वायंगणी ग्रा. पं.सदस्य श्रीकृष्ण वायंगणकर,अना हडकर,गणेश पाटील,ज्योती हडकर,प्रमोद पाटील,ओंकार पाटील,अमित पाटील सिद्धेश पाटील,स्नेहल पाटील,गीता पाटील, मधुकर पाटील, बाबल नाईक आदीसह शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा