You are currently viewing एमआयटी एडीटी विद्यापीठात ‘टॅलेंट फ्यूजन’ उत्साहात

एमआयटी एडीटी विद्यापीठात ‘टॅलेंट फ्यूजन’ उत्साहात

*एमआयटी एडीटी विद्यापीठात ‘टॅलेंट फ्यूजन’ उत्साहात*

पुणे:

एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या स्कुल ऑफ काॅर्पोरेट इनोवेशन आणि लिडरशिप (एससीआयएल) यांच्या विद्यमाने आयोजित ‘टॅलेंट फ्यूजन २k२४’ या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा उत्साहात पार पडला. या स्पर्धेचे उद्दिष्ट विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या रोजगार कौशल्यांचा विकास करणे होते.

विद्यार्थ्यांमधील क्षमता आणि व्यावसायिक कौशल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन होते. या वर्षीच्या पहिल्या फेरीत संपूर्ण विद्यापीठातून १९०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ३ फेऱ्यांमधून अंतिम “एलेवेटर पीच” साठी १० स्पर्धकांची निवड करण्यात आली आणि त्यातून ३ विजेते घोषित करण्यात आले. ज्यामध्ये मधुर पाटील, प्रसाद बोकारे आणि अभिषेक सहा यांनी अणुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला.

या स्पर्धेसाठी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांचे मार्गदर्शन लाभले. प्रमुख पाहुणे म्हणून प्र.कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी उपस्थित होते. स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पंच म्हणून प्रा. डॉ. रेणू व्यास, प्रा. श्रीकांत गुंजाळ, प्रा. सिद्धार्थ साळवे, प्रा. दिल किरत सरना यांनी जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. शिखा काबरा आणि प्रा. सारा रोज यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. जयदीप शिरोटे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा