You are currently viewing उबाठात हिम्मत असेल तर महाविकास आघाडीतून बाहेर पडून स्वतःच्या ताकतीवर निवडणूक लढवून दाखवावी

उबाठात हिम्मत असेल तर महाविकास आघाडीतून बाहेर पडून स्वतःच्या ताकतीवर निवडणूक लढवून दाखवावी

उबाठात हिम्मत असेल तर महाविकास आघाडीतून बाहेर पडून स्वतःच्या ताकतीवर निवडणूक लढवून दाखवावी

*भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आव्हान

कणकवली

भाजप पक्ष प्रत्येक निवडणूक हिमतीवर आणि ताकतीवर लढवतो आणि म्हणूनच हरियाणात तिसऱ्यांदा सत्ता प्राप्त केली आणि जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही स्थापन करून सर्वाधिक जास्त मतं भारतीय जनता पार्टीने मिळवली. उबाठा पक्ष आणि संजय राऊत याचा मालक उद्धव ठाकरे यांच्यात खरं हिम्मत असेल, त्यांची स्वतंत्र लढण्याची लायकी असेल तर महाविकास आघाडीच्या कुबड्या घेऊन निवडणूक लढण्या पेक्षा त्यांनी स्वतःच्या जोरावर,ताकतीवर विधानसभेच्या 288 जागा महाराष्ट्रात लढाव्यात. हिम्मत असेल तर उद्याच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी स्वतंत्र निवडणुकीची घोषणा करावी. असे आव्हान भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी दिले.
कणकवली येथील ओम गणेश निवासस्थान येथे पत्रकारांशी बोलत होते यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले. काँग्रेसचा हरियाणा विधानसभेत दारुण पराभव झाला. जम्मू-काश्मीरमध्ये फक्त सहा जागा काँग्रेसला मिळाल्यात. आता पत्रकार परिषदेतून आणि अग्रलेखातून काँग्रेसवर डोळे वटारण्यापेक्षा हिम्मत असेल तर उबाठा ने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे आणि स्वतंत्र निवडणूका लढाव्यात, मगच भारतीय जनता पार्टी बरोबर स्वतःची तुलना करण्याची हिम्मत करावी असेही खडे बोल आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना सुनावले.
जमू काश्मीर मध्ये 29.16 टक्के वोट शेअर भाजपा चा आहे. आणि ठाकरे ज्यांच्या पडले त्या काँग्रेस ला हरियाणा आणि जम्मू जिंकता आलं नाही. जम्मू काश्मीर मध्ये फक्त सहा आमदार निवडून आले.काँग्रेस आणि उबाठा म्हणजे वर्गातील दोन ढ विध्यार्थी एकमेकाला सल्ले देण आहेत. लोकसभेत उबाठा स्ट्राईक रेट खराब होता आता विधानसभेत काँग्रेस नापास होत चालली आहे.राज्यात ह्यांना केवळ मनोरंजन म्हणून बघितलं जातं.
बॉक्स
अरबी समुद्रातील शिव स्मारकाच्या विरोध न्यायालयात याचिका करणारा मातोश्रीचा जावई
अरबी समुद्रात शिव स्मारकला विरोध करणारा कोणाचा प्रचार करतोय हे आधी पहा. वकील असीम सरोदे मातोश्रीचा जावाई आहे. त्याने अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. म्हणून शिवस्मारक थांबले.हिम्मत असेल तर असीम सरोदे ला भर चौकात चपल मारून दाखवा असे आव्हान उबाठा पक्षाला आमदार नितेश राणे यांनी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा