You are currently viewing रंग निळा

रंग निळा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम लेख*

 

*🌌 रंग निळा*🌌

 

रंग निळा म्हटलं की अफाट निळं आकाश आठवतं..सदैव आपल्या नजरेस दिसणारं..कधी फिकट तर रात्री गडद होणारं….चांदणप्रकाशात लख्ख उजळणारं निळं आकाश न्याहाळत वेळ कसा जातो कळतही नाही.

तसाच विशाल..अफाट पसरलेला ….दृष्टी जाईल तिकडे पाणीच पाणी असणारा.. अथांग सागर…!

निळा रंग शांततेचं प्रतिक..

पांढ-या वहीवर निळी अक्षरं,

शब्द, अक्षरांचं लेणं उमटवतं

व वाचक तृप्त होतो.

निळी कमळं,कृष्ण कमळ रंगांच्या गडद छटांनी उठून दिसतात…तर मोराचा डौलदार पिसारा निळ्या जांभळ्या रंगांनी चित्त आकर्षून घेतो.

निळा रंग शौर्य, संपन्नता व शांतीचंही स्वरूप आहे.आपल्या राष्ट्रध्वजावरील चक्र निळेच आहे.शांतता, एकतेचे प्रतिक निळा रंंग आहे.तो शुचिता,समृद्धीही असतो.निळारंग सेवाभाव दर्शवतो..अनेक ठिकाणी गणवेष निळाच असतो.शाळा,कारखाने..।एकतेचं प्रतिकच असते ते..

निळे डोळे लक्ष वेधून घेतात….

आणि तो घननीळ मेघश्याम ..राधा,मीरा,गोपिका सगळ्यांच्याच आकर्षणाचा केंद्र बिंदू,विशाल आभाळ,विस्तीर्ण सागर आणि चराचरात व्यापलेला हा नीलवर्ण श्रीकृष्ण…!

 

असा हा निळा रंग सगळ्यांना शांतता मिळवून देवो….हीच जगदंबेला मनःपूर्वक प्रार्थना..

 

*शिरोमणी रचना*

 

*निळ्या नभाची निळाई*

 

*निळाई*

निळे आकाश

दृष्टीक्षेपात कधी मावेना विस्तीर्ण विस्तृत असेअवकाश…

 

*निळाई*

अथांग सागर

गूढ गहन भासते

निळी सागराची अथक लहर…

 

*निळाई*

नजरेत भरता

गर्द निळा जांभळा

पानाफुलांत सुरेख रंग गवसता…

 

*निळाई*

गो-या गालावर

मोरपीस अलवार फिरतं

गोड आठवांचा मनात जागर….

 

*निळाई*

दिव्य अनुभूती

श्रीरंग निळा शोभे

ह्रदय गाभारी अनन्य मूर्ती…..!

 

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

💙

*अरुणा दुद्दलवार!@✍️*

प्रतिक्रिया व्यक्त करा