You are currently viewing उभादांडा रोजरी चर्च सुशोभिकरण साठी २७ लाख रुपये मंजूर : मंत्री दीपक केसरकर यांचे सहकार्य

उभादांडा रोजरी चर्च सुशोभिकरण साठी २७ लाख रुपये मंजूर : मंत्री दीपक केसरकर यांचे सहकार्य

उभादांडा रोजरी चर्च सुशोभिकरण साठी २७ लाख रुपये मंजूर : मंत्री दीपक केसरकर यांचे सहकार्य

शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते झाले भूमिपूजन..

वेंगुर्ले

शालेय शिक्षण मंत्री श्री. दीपकभाई केसरकर यांच्या प्रयत्नातून अल्पसंख्याक विभाग विकास कार्यक्रम अंतर्गत उभादांडा रोजरी चर्च सुशोभिकरण साठी २७ लाख रुपये मंजूर झाले आहेत. या कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हा समन्वयक श्री. सचिन वालावलकर यांच्या हस्ते करण्यात आले.

अल्पसंख्याक विभाग विकास कार्यक्रम अंतर्गत उभादांडा रोजरी चर्च सुशोभिकरण साठी महाराष्ट्र अल्प संख्याक विकास परिषद सिंधुदुर्ग चे जिल्हा उपाध्यक्ष श्री. कार्मिस आल्मेडा यांनी मागणी व पाठपुरावा केलेला होता. त्या नुसार ही मंजुरी मंत्री केसरकर यांच्या मुळे मिळाली आहे. या भूमिपूजन कार्यक्रम वेळी श्री. वालावलकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उभादांडा क्रिस्ती बांधव मोट्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी नगराध्यक्ष श्री. सुनील डुबळे, माजी सभापती श्री. सुनील मोरजकर, उभादांडा सरपंच निलेश चमणकर, उपसरपंच सौं. टीना आल्मेडा, श्री. कार्मिस आल्मेडा श्री. नयन पेडणेकर, ग्रा.प. सदस्य श्री. राधाकृष्ण पेडणेकर, माजी सरपंच श्री. इलीयस फर्नांडिस सह असंख्य क्रिस्ती बांधव उपस्थित होते. यावेळी सचिन वालावलकर यांनी चर्च साठी इन्व्हर्टर देण्यार असल्याचे सांगितले. सर्वानी आमदार दीपकभाई केसरकर यांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा