*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*
*प्रेमात सुख असते*
दुःख सोडून दे वेडी प्रेमात सुख असते
तू एक कटाक्ष टाक एवढी भूक असते ।।
घाबरु नको कधी ही शंका ही नको घेऊस
मला कोणी पाहील का ? खोटी धुक् धुक् असते ।।
पाहिलं तर भिऊ नको वाग जरा बिनधास्त
तुटायला हवं आपलं साल्यांची ढूक असते ।।
तू बस खिडकीत मी उभा राहीन दारात
निरोप वारा देतो ना प्रेम आपसुक असते ।।
नको देऊस चुंबने मिठी ही नको मारुस
गोड हास ना गालात ती भाषा मूक असते ।।
जाणून घेईन सर्व तू असली स्तब्ध जरी
मान हलव होकारार्थी एवढी चूक असते ।।
*©सर्वस्पर्शी*
©कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख.
नाशिक ४२२०११
मो. ९८२३२१९५५०