*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री विद्या रानडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ललिता पंचमी/स्कंदमाता*
ही कथा आहे चतुर्भुजेची ।
ललितादेवीची
पाचव्या माळेची।
ललितापंचमीची॥१॥
व्रत आचरिता प्रसन्न होई।
समृध्दी,उत्कर्ष दायिनी
मृदु कोमल मनाची।
ललिता देवी आजची॥२॥
स्कंद माता म्हणती तियेला।
ती कार्तिकेयांची आई
सिंहावर आरूढ देवी।
कार्तिकेय तिच्या अंकावरी॥३॥
तारकासुराचा विनाशकरण्या।
अशक्य होई देव,मानवा
केवळ शिव पार्वतीचा पुत्र।
तोच करेल वध त्याचा ॥४॥
कार्तिकेयांनी मारिला राक्षस।
भयमुक्त केले देव मानवास
त्या षडाननाच्या मातेस ।
आज वंदन त्रिवार॥५॥
रूप अति सुंदर,अलंकारविभुषित।
सदैव स्मित अधरावरी।
चला पुजूया स्कंदमातेस।
ललितादेवीस नमन करूया॥६॥
विद्या रानडे
१९|१०|२३