You are currently viewing गोमातेला राज्यमाता दर्जा..

गोमातेला राज्यमाता दर्जा..

*मोकाट गाईंच्या संगोपनासाठी खरेदी केली स्वखर्चाने दीड एकर जागा*

 

*युवा नेते विशाल परब यांची असामान्य कल्पना, इतरांना प्रेरणादायी*

 

*विश्व हिंदू परिषदेकडे देणार जबाबदारी; भाजपा युवा नेत्याचा सेवाभावी उपक्रम*

 

शहरात बऱ्याच ठिकाणी गुरांचा वापर संपला की त्यांना मोकाट सोडून दिले जाते. जोपर्यंत दूध देतात तोपर्यंत गाईंना गोठ्यात बांधतात आणि नंतर चरण्यासाठी मोकाट सोडतात. ही गुरे मग दिवसा रात्री शहरातील फुटपाथ, रस्ते, बगीचा आदी ठिकाणी बसलेली असतात. त्यामुळे अनेकदा अपघात घडून नाहक लोकांना शारीरिक इजा होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक शहरात हीच परिस्थिती आहे.

गो मातेला अलीकडेच राज्यसरकारने राज्यमाता दर्जा दिला आहे. परंतु गाईंची ससेहोलपट संपलेली नाही. दोडामार्ग शहरात अशीच मोकाट सुटलेली गुरे बाजारपेठेतील मुख्य चौकात बसलेली असतात. दोडामार्ग बाजारपेठेतील मोकाट सोडलेल्या गुरांमुळे जवळपास ७० अपघात झाल्याची नोंद आहे. त्याचबरोबर मोकाट फिरणारे भटके कुत्रे काहीवेळा गाईंना चावा घेतात, त्या जखमी अवस्थेत फिरताना पाहणे कठीण होऊन बसते. सावंतवाडीतील युवा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब हे दोडामार्ग कडून गोवा येथे जाताना त्यांच्या गाडीला देखील अपघात होण्याची शक्यता होती. त्यावेळी विशाल परब यांनी अशा मोकाट सोडलेल्या गो मातेसाठी काहीतरी केलं पाहिजे या उद्देशाने दोडामार्ग येथे दीड एकर जागा खरेदी केली व तिथे मोकाट फिरणाऱ्या गुरांचे संगोपन करण्याचे ठरविले. या गो मातांची जबाबदारी विश्व हिंदू परिषदेकडे द्यायची व गो मातांच्या संगोपनासाठी येणारा खर्च युवा नेते विशाल परब यांनी स्वतः करण्याचे ठरविले. त्यामुळे भविष्यात दोडामार्ग शहरात मोकाट गुरांपासून नागरिकांना होणारा त्रास तर वाचणार आहेच परंतु गो मातांचे चांगले संगोपन झाल्याने गो संवर्धन वाढीस लागेल. दोडामार्ग बाजारपेठेत गुरांमुळे होणारे अपघात कमी होतील.

युवा नेते विशाल परब यांनी गो मातांचे संगोपन करण्याचा हाती घेतलेला उपक्रम ही असामान्य कल्पना असून नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे दोडामार्ग परिसरातील जनतेकडून त्यांच्या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा