You are currently viewing १० पटाच्या आतील शाळांवर स्थानिक डीएड उमेदवारांना नियुक्ती द्या…

१० पटाच्या आतील शाळांवर स्थानिक डीएड उमेदवारांना नियुक्ती द्या…

१० पटाच्या आतील शाळांवर स्थानिक डीएड उमेदवारांना नियुक्ती द्या…

बेरोजगार समितीचे उद्यापासून बेमुदत आंदोलन..

सिंधुदुर्गनगरी
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मधील १०पटसंख्येच्या शाळेवरील शिक्षकांच्या रिक्त पदांवर जिल्ह्यातील स्थानिक डीएड उमेदवारांना कंत्राटी शिक्षक म्हणून तात्काळ नियुक्ती द्यावी. या मागणीसाठी डीएड बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने ८ ऑक्टोबर पासून जिल्हा परिषद समोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे. अशी माहिती डीएड बेरोजगार संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय फाले यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्हा डी एड बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डीएड बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने गेली दहा ते बारा वर्षे जिल्ह्यातील डीएड बेरोजगारांना न्याय मिळावा, यासाठी संघर्ष करत आहोत. दिनांक ११ जुलै २०२४ च्या आंदोलन स्थळी शालेय शिक्षण मंत्री यांच्या शिष्टमंडळाने भेट दिली होती, त्यानंतर मुंबई शिक्षण संचालनालय येथे झालेल्या बैठकीत जिल्ह्यात १० पटसंख्या असलेल्या ४७८ शाळेतील जागांवर एका कायमस्वरूपी शिक्षकाबरोबर एक कंत्राटी शिक्षण सेवक घेण्याबाबत डीएड बेरोजगारांना आश्वासित केले होते. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभागात या संदर्भात माहितीची सत्यता पडताळल्यानंतर दहा दिवस चालू असलेले आंदोलन तूर्तास मागे घेतले होते. त्यासंबंधी संघर्ष समितीच्या प्रयत्नामुळे व सततच्या पाठपुराव्यामुळे २३ सप्टेंबर २०२४ चा शासन निर्णय निर्गमित झाला, हा शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर तब्बल पंधरा दिवस उलटून गेले तरी जिल्हापरिषद प्रशासनाकडून अजूनही नियुक्त्या दिलल्या नाहीत. तरी डीएड बेरोजगारांना दिलेल्या आश्वासनानुसार तात्काळ नियुक्त देण्यात याव्यात. येत्या आठवड्याभरात विधानसभा निवडणुकीची आचारसहिता लागण्याची दाट शक्यता आहे, तरी कंत्राटी शिक्षक नियुक्तीची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण व्हावी. यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत. याकड़े शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार ८ ऑक्टोबर पासून जिल्ह्यातील सर्व डीएड बेरोजगारानी त्यांच्या कुटुंबांना घेऊन जिल्हा परिषद समोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. तरी शासनाने याची दखल घेऊन कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया तात्काळ करावी,स्थानिक डीएड उमेदवाराना न्याय द्यावा. अशी स्थानिक डी एड बेरोजगारांची मागणी आहे.

नियुक्ती देताना या बाबी विचारात घ्याव्यात

सदर नियुक्त्या देत असताना डीएड पदविका ज्येष्ठता (वर्ष) हा निकष ठरविण्यात यावा,. हा कंत्राटी शिक्षक भरतीचा शासन निर्णय महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी लागू आहे असे असूनही काही पर जिल्ह्यातील उमेदवारांनी दुसऱ्या जिल्ह्यात अर्ज केले आहेत त्यामुळे सदर उमेदवार हा त्या जिल्ह्याचा स्थानिक आहे की नाही याची नीट छाननी करूनच नियुक्ती द्याव्यात,. पर जिल्ह्यातील उमेदवारांना संधी देऊ नये .डीएड बेरोजगार संघर्ष समितीच्या प्रयत्नामुळे व पाठपुराव्यामुळे सदर शासन निर्णय निर्गमित झाल्यामुळे डीएड बेरोजगार संघर्ष समितीच्या २५० उमेदवारांना प्राधान्याने संधी देण्यात यावी,व त्यानंतर जिल्ह्यातील इतर स्थानिक उमेदवारांना सामाऊन घ्यावे., एक ते पाचवी प्राथमिक स्तरावर बीएड उमेदवारांना घेण्याबाबत मा उच्च न्यायालयाने बंदी घातल्यामुळे उच्च प्राथमिक स्तरावर ६ ते ८ वी साठी त्यांचा विचार करण्यात यावा. एक ते पाचवी प्राथमिक स्तरावर विचार करू नये. असे या निवेदनातून सूचित केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा