*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित सुधाकरी रचना*
*...रंग पांढरा….*
नितळ निर्मळ।
रंग हा धवल।
शुध्दता विमल।
दिपणारी।।
तो नगाधिराज
हिम आच्छादित
सुपर्ण हरित
वृक्षराजी।।
पवित्र रांगोळी
शुभ्र पारिजात
सडा अंगणात
पहाटेला।।
धवल वसना
माता सरस्वती
वाणी कला मती
तिची कृपा।।
शुभ्र राजहंस
मोती पाणीदार
कंठी शोभे हार
ललनेच्या।।
शुभ्र तारकांचा
नभात पिसारा
सागरी किनारा
फेसाळता।।
उदात्त पांढरा
रंग तो त्यागाचा
सत्य नि शिवाचा
सुंदरच!!
〰️〰️🌷☘️🌷〰️〰️
अरुणा दुद्दलवार@✒️