❣️ बायको❣️
बायको जर नसेल तर
राजवाडा पण सुना आहे
बायकोला नावं ठेवणे हा 🙅
खरंच गंभीर गुन्हा आहे ! 🙅
💁खरं पाहिलं तर तिच्याशिवाय
🍃 पानही हालत नाही…
घरातलं कोणतंच सुख
बायको शिवाय फुलत नाही !💃
💁 नोकरी अन पगाराशिवाय
नवऱ्याजवळ आहे काय?🙆
तुलनाच जर केली तर
सांगा, तुम्हाला येतं काय?🙇
💁 स्वच्छ, सुंदर,पवित्र घर 🏡
बायकोमुळेच असतं…
नवरा नावाचं विचित्र माणूस
तिलाच हसत बसतं !
वय कमी असून सुद्धा
बायको समजदार असते..👩👱
बायकोपेक्षा नवऱ्याचे वय👴👨
म्हणूनच जास्त असते !
💁तिचा दोष काय तर म्हणे
चांगल्या सवयी लावते !
कुटुंबाच्या कल्याणासाठी🏃
दिवस रात्र धावते !
🙅 चिडत असेल अधून मधून
सहनशीलता संपल्यावर;
तुम्हीच सांगा काय होणार
चोवीस तास जुंपल्यावर ?
बायकोची टिंगल करून
फिदी फिदी हसू नका..😁
तिच्या यादीत मूर्ख स्थानी
नंबर एक वर बसू नका…🙇
💁बायको म्हणजे अंगणातला
प्राजक्ताचा सडा !🌸🌼🌺
बायको म्हणजे पवित्र असा
अमृताचा घडा !⚱
बायको म्हणजे सप्तरंगी🌈
इंद्रधनुष्य घरातलं !
देवासाठी गायलेलं
भजन गोड स्वरातलं !🎶
🙎नवरोजी 💁बायकोकडे
माणूस म्हणून पहा..
तिचं मन जपण्यासाठी
थोडं शांत रहा..😷🙅
कधीतरी कौतुकाचे
दोन शब्द बोलावे🙋
तिच्या वाट्याचे एखादं कामं तरी
आनंदाने झेलावे !🙆
संसारासाठी, घरासाठी झटणाऱ्या सर्व नव दुर्गेला मनापासून समर्पित 🙏🙏
*संग्रह#अजित नाडकर्णी,शुभांजीत सृष्टी*🌷🌷🌷🌷🌷🌷🌷