You are currently viewing पाट येथे विहिरीत पडलेल्या खवल्या मांजराची वनविभागाकडून यशस्वी सुटका..

पाट येथे विहिरीत पडलेल्या खवल्या मांजराची वनविभागाकडून यशस्वी सुटका..

कुडाळ :

कुडाळ तालुक्यातील पाट (गांधीनगर) येथे श्री. शंकर भगवान मराळ यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या अत्यंत दुर्मिळ अशा वन्यप्राणी खवल्या मांजराची वनविभागाकडून नैसर्गिक अधिवासात यशस्वी सुटका करण्यात आली.

आज ५ ऑक्टोबर रोजी दुपारी सावंतवाडी वन विभागाला पाट (गांधीनगर) येथे विहिरीत वन्यप्राणी खवले मांजर पडले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कुडाळ वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल अधिकारी श्री.संदीप कुंभार यांचे नेतृत्वाखाली जलद बचाव पथक वन्यप्राणी खवल्या मांजराच्या सुटकेसाठी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. विहीर परिसरात वाढलेल्या वेलींचा अंदाज न आल्याने विहीरत पडलेल्या खावल्या मांजरास सुखरूप रित्या बाहेर काढण्यासाठी पाट (गांधीनगर ) येथील ग्रामस्थ शंकर मराळ, किशोर मराळ यांचे मदतीने वनविभागाच्या रेस्क्यू टीमने नायलॉन जाळीच्या साह्याने विहिरी मधून यशस्वीरित्या खवल्या मांजराची सुटका करणेत आली. त्यानंतर कुडाळ येथील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रज्ञा ओव्हाळ, पशुधन विकास अधिकारी डॉ. सतीश कानगुले यांचे कडून सदर खावल्या मांजरची आरोग्य तपासणी करून आवश्यक उपचार केले. नंतर खवल्या मांजरास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

ही बचाव मोहीम श्री. नवकिशोर रेड्डी उपवनसंरक्षक वनविभाग सावंतवाडी ,श्री.सुनील लाड सहाय्यक वनसंरक्षक वनविभाग सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संदीप कुंभार वनक्षेत्रपाल कुडाळ, दिनेश टिपूगडे वनपाल नेरूर तर्फे हवेली, सचिन पाटील वनरक्षक नेरूर तर्फ हवेली, प्रसाद पाटील वनरक्षक आकेरी, यशवंत कदम वनसेवक नेरूर,अनिल गावडे, अमृस्कर यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

नेरूर तर्फ हवेली वनपाल दिनेश टिपूगडे यांनी सदर ठिकाणच्या ग्रामस्थांचे आभार मानले. खवल्या मांजर या अत्यंत दुर्मिळ वन्यप्राण्याचे महत्त्व सांगताना. हा वन्यप्राणी अत्यंत दुर्मिळ मॅनिस प्रजातीतील सस्तन प्राणी आहे. ज्याची त्वचा खवल्यानी आच्छादलेली असते असा एकमेव सस्तन प्राणी आहे. ज्याची खवले शृंगप्रथिने या पदार्थापासून बनलेली असतात. या प्रजातीचा आकार ३० ते १०० सेंमी असतो. खवल्या मांजर हे निशाचर आहे आणि त्याच्या आहारात प्रामुख्याने मुंग्या आणि वाळवी आपल्या लांब जिभेचा वापर करून खातात असल्याचे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा