You are currently viewing टपाल विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावरील पत्रलेखन स्पर्धेसाठी सहभागी होण्याचे आवाहन

टपाल विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावरील पत्रलेखन स्पर्धेसाठी सहभागी होण्याचे आवाहन

टपाल विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावरील पत्रलेखन स्पर्धेसाठी सहभागी होण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

भारत डाक विभागामार्फत या वर्षी “ढाई आखर” राष्ट्रीय स्तरावरील पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थांनी, नागरिकांनी या स्पर्धेत उत्सफूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुदुर्ग विभागाचे डाकघर अधीक्षक मयुरेश कोले यांनी केले आहे.

          या स्पर्धेचा विषय “डिजिटल युगात पत्रांचे महत्व” असे असून मराठी, हिदी व इंग्रजी भाषेतील पत्र स्वीकारले जाणार आहे. हि स्पर्धा खुली असून 18 वर्षापर्यंत  व 18 वर्षावरील अशा दोन गटात होईल. पत्रलेखनाकरीता शब्द मार्यादा पोस्ट लिफाफा/ साध्या लिफाफ्यामधून (आवश्यक तिकीट लावून) ए-4 साईज पेपरवर जास्तीत जास्त 1000 शब्द व आंतर्देशीय पत्रावर जास्तीत जास्त 500 शब्द आहे. स्पर्धेकांनी लिफाफ्यावर / आंतर्देशी पत्रावर आपले नाव व संपूर्ण पत्ता लिहावा तसेच लिफाफा/ आंतर्देशीय पत्रावर वरील बाजूस “ढाई आखर”राष्ट्रीय स्तरावरील पत्रलेखन स्पर्धा असे नमूद करावे स्पर्धकांनी सदरची पत्र दि. 14 डिसेंबर 2024 पर्यंत चीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई 400001 या पत्यावर पाठवावे.

           महाराष्ट्र मंडळ स्तरावील निवडक पहिल्या 3 पत्रांना (गटा प्रमाणे) प्रथम क्र. रु. 25 हजार, व्दितीय क्र.रु. 10 हजार, तृतीय क्र. रु. 5 हजार ची पारितोषिके दिली जातील. मंडळ स्तरावरील तीन बक्षिसपात्र पत्रे राष्ट्रीय स्तरावर पाठविली जाणार असून तेथे पुन्हा क्रमांक काढण्यात येतील व पहिल्या तीन क्रमाकांच्या पत्रांना अनुक्रमे रु.50 हजार, रु.25 हजार व रु.10 हाजर अशी पारितोषिक दिली जातील. अधिक माहितीसाठी नजीकच्या डाकघरशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा