* काँग्रेसने आरक्षण संपविण्याची भाषा केली तर तुमची ढाल बनून आम्ही उभे राहणार..!
* आरक्षण बचाव रॅलीत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास
*कणकवलीत राहुल गांधींच्या विरोधात आरक्षित समाज उतरला हजारोंच्या संख्येने रस्त्यावर
* आरक्षण बचाव रॅलीचे झाले भव्य सभेत रूपांतर, अनेक वक्त्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा घेतला समाचार
*आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम
*जय हिंद,जय भीम चा नारा देत आमदार नितेश राणे यांनी आंबेडकरी जनतेची जिंकली मने
कणकवली;
देशातील ज्या ज्या घटकाला संविधानाने आरक्षण दिलेले आहे ते त्यांचे हक्काचे आरक्षण आहे. हे आरक्षण काँग्रेस आणि त्यांच्या गठबंधन मधील पक्षांना आम्ही संपवू देणार नाही.जो पर्यंत या देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, देशात एनडीए चे सरकार आहे. राज्यात महायुतीचे सरकार आहे.तो पर्यंत आरक्षणाला हात लावण्याची हिंमत काँग्रेस आणि त्याच्या मित्र पक्षांना करू देणार नाही. जेव्हा असे प्रयत्न होतील तेव्हा तुमची ढाल बनून आम्ही भाजपचे कार्यकर्ते,एनडीए गठबंधन मधील सर्वच कार्यकर्ते उभे राहू मात्र आरक्षण संपवू देणार नाही असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे कणकवली- देवगड- वैभववाडी चे आमदार नितेश राणे व्यक्त केला.
गांधी घराण्याचे वारस, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण विरोधी केलेल्या विधानानंतर त्याची दखल देशात घेणे गरजेचे आहे. काँग्रेसने कायमच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अन्याय केला आहे. पंतप्रधान मोदी आरक्षणाचे संरक्षण करायला समर्थ आहेत. आरक्षण विरोधी बोलणाऱ्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे जे नेते उद्या प्रचाराला येतील त्यांना राहुल गांधींच्या आरक्षण संपवण्याच्या विधानाचा जाब विचारावा असे आवाहन भाजपा प्रवक्ते तथा आमदार नितेश राणे यांनी कणकवली येथील आरक्षण बचाव रॅलीत केले. जय हिंद जय भीम चा नारा देत आमदार नितेश राणे यांनी आंबेडकरी जनतेची मने जिंकली.
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत, आरपीआय जिल्हाध्यक्ष रमाकांत जाधव, भाजपा एससी मोर्चा जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, भाजपा प्रवक्ते अंकुश जाधव, आरपीआय जिल्हाध्यक्ष अजित कदम,डॉक्टर मिलिंद कुलकर्णी,सदा ओगले, भाजपा जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव, चर्मकार समाज राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण, उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण,भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, माजी नगरसेवक गौतम कुडकर, मंडळ अध्यक्ष अजित कांबळे, विधानसभा मतदारसंघ प्रमुख मनोज रावराणे, माजी सभापती शारदा कांबळे, कलाकार मानधन समिती अध्यक्ष संतोष कानडे, पडेल मंडळ अध्यक्ष बंड्या नारकर, कणकवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिलीप तळेकर, शहर मंडळ अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, वैभववाडी तालुका अध्यक्ष सुधीर नकाशे, मानसी जाधव, राजेश चव्हाण, अजित तांबे, गौतम खुडकर, सुशील कदम शशांक ठाकूर, राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. प्रस्ताविक अजित कांबळे तर सूत्रसंचालन अशोक कांबळे यांनी केले.
आरक्षण बचाव रॅलीचे मेळाव्यात रूपांतर झाल्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून तसेच राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले या सर्व महामानवांच्या प्रतिमान समोर नतमस्तक होऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले, मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला माहिती असायला हवी की कोणत्या विचारला आपण मतदान करत आहोत. राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण विरोधी विधान केले तेच जर पंतप्रधान मोदी यांच्याकडून झाले असते तर आज देशभरात गावागावात वाड्यावस्त्यांवर भाजपा आणि मोदींविरोधी रान उठवले असते. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपा संविधान बदलणार अशा वावड्या उठवून बहुजन समाजाला फसवलं गेले. आता अशा भूलथापांना बळी पडू नका.
भाजपा चे सरकार आल्यावर संविधान बदलणार ह्या फसव्या प्रचारा वेळी मतदारांनी त्याचा पुरावा मागितला नाही. मागासवर्गीय जनतेला आपण काहीही सांगितले तरी ते आपल्यावर विश्वास ठेवतात ह्यामुळे आज राहुल गांधी विदेशात जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करतात. आरक्षण बचाव रॅली तून घरी जाताना विचार करा की आरक्षणामुळे ग्रा.प. सदस्य,सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सभापती, नगरसेवक नगराध्यक्ष होण्याचा हक्क मागासवर्गीय आरक्षित जनतेला मिळाला आहे. जर काँग्रेसला आपण साथ दिली तर हे आरक्षण राहुल गांधी बंद करणार आहेत. जर राज्यात उद्या काँग्रेस विचारांचे सरकार आले तर आपल्या हक्काचे हे आरक्षण संपेल हे लक्षात घ्या. देशाला संविधान, राज्य घटना देणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसने कायम पाण्यात पाहिले. कायम बाबासाहेबांवर काँग्रेसने अन्याय केला. याउलट पंतप्रधान मोदी यांनी बाबासाहेबांच्या स्मृतीला आणि संविधानाला मोठे करण्याचे काम केले. राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधात केलेले विधान आजवर नाकारले नाही. किंवा त्यांनी आपली चूक झाली अशी कबुली दिली नाही त्यामुळे उद्या जेव्हा काँग्रेसवाले, महाविकास आघाडीवाले प्रचाराला येतील तेव्हा त्यांना तुम्ही त्यांना जाब विचारा आणि आरक्षण रद्द करण्याचा राहुल गांधींच्या भूमिकेचे काय ? त्यांनी आजपर्यंत माफी का मागितली नाही हे विचारा.
आरक्षण बचाव रॅली काढण्यामागे मागासवर्गीय आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या जनतेमध्ये राहुल गांधींच्या आरक्षणीविरोधी भूमिकेबद्दल जनजागृती व्हावी हा उद्देश आहे. आज बौद्ध, चर्मकार, ठाकर, धनगर ,आदिवासी,ओबीसी, मराठा,समाजाचे नेते या रॅलीत सहभागी झाले आहेत. आज उघडपणे आरक्षण विरोधी बोलणाऱ्या काँग्रेस ची सत्ता आली तर ते आरक्षण संपवल्याशिवर राहणार नाहीत ही धोक्याची घंटा आहे ती ओळखा असे आमदार नितेश राणे यांनी आवाहन केले.
*भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत*
अष्टावधानी नेता कणकवली,देवगड, वैभवाडी तालुक्याला आमदार नितेश राणे यांच्या रूपाने लाभला हे येथील जनतेचे भाग्य आहे.आजच्या आंदोलनानंतर राज्यभरात आरक्षण बचाव रॅलीला सर्वात होईल आणि आपण त्याचे जनक आसाल असा सांगतानाच भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले.
भाजप कधीही आरक्षण विरोधी नव्हते आणि असणार नाही. भाजपला विरोध करण्यासाठी हा मुद्दा आणला. आणि आरक्षण घालवणार असे म्हणणारे राहुल गांधी यांना पुन्हा एकदा भारत देश कमकुवत करायचा आहे. त्यांना अशा कमकुवत भारत देश हवा आहे. त्यांना सक्षम देश नकोच आहे. त्यांना आपल्या देशाला परदेशी शक्तीच्या घशात घालण्याची ईछा आहे. त्यामुळेच आरक्षण काँग्रेस संपविणार अशी भाषा करते. याच काँग्रेस ने डॉ. बाबा साहेब यांना लोकसभेत निवडून जावू दिले नाही. तेथे विरोध केला.त्यांना मरणोत्तर सुद्धा पुरस्कार देण्यास टाळाटाळ केली. स्मारक उभी करण्यास विरोध केला असे असताना भाजपने मात्र सर्वार्थाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात केले. त्याची लंडन पासून इंदू मिल पर्यंत स्मारके उभी केली. या सर्वांचा विचार केला तर डॉ . आबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांना भाजपने नेहमीच आपले मानले नवीन योजना आणल्या मात्र काँग्रेसने काहीच केले नाही हे सिद्ध होते. अशी टीका केली.
*डॉ. मिलिंद कुलकर्णी*
भाजप संविधान बदलणार असा प्रचार केला आणि काँग्रेस ने आपली सर्वांचीच डोकी भडकवली.राहुल गांधी हे विरोधी पक्षांचे नेते आहेत त्यांचे मत म्हणजे त्याच्या सोबत असलेल्या सर्व राजकीय पक्षांचे ते मत आहे.
1945 सली बाबासाहेबांनी लिहिलेले पुस्तक “व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू द अनटचेबल्स” वाचा त्याचे मराठी नाव (काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांसाठी काय केले) त्यातून खरी काँग्रेस तुम्हाला कळेल.गोलमेज परिषदेत काँग्रेसला डॉ. बाबासाहेबांनी विरोध केला. कारण त्यांनी काँग्रेस ही आंबेडकरी जनतेला आईचे नाही तर दाईचे प्रेम करणारी आहे. अशी टीका केली आहे.भाजप ने ए.पी.जे. अब्दुल कलाम,रामनाथ कोविंद,द्रौपदी मुर्मु असे दलीत आदिवासी आरक्षित समाजाचे राष्ट्रपती बनविले.त्यामुळे आरक्षण घेवून नुकतेच सक्षम होवू पाहणाऱ्या दलीत,बहुजन समाजाला आरक्षण काडून घेण्याची भाषा करता.काँग्रेस आणि राहुल गांधी यांची लोकसभेत असलेली भूमिका आणि आता आरक्षण रद्द करणार अशी भूमिका घेता ही फसवणूक लक्षात घ्या . यापुढे दलीत आदिवशी समाजाचे हित ओळखा आणि काँग्रेसला त्यांची जागा दाखवा असे आवाहन डॉ. कुलकर्णी यांनी केले.
*गौतम खुडकर*
काँग्रेस ने बहुजन वादी चळवळ नेहमीच संपविली. नामांतराच्या चळवळीत सुद्धा अशी काँग्रेसने फाटाफूट केली.बहुजन समाज,आंबेडकरी जनता सुज्ञ आहेत.
धर्म निरपेक्षतेचे बुरखे आता फाडनसात
*अंकुश जाधव*
काँग्रेस जातीयवादी असल्यामुळे त्यांनी इंदू मिल ची जागा आज पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी घेतली नाही. मात्र भाजप ची सत्ता येताच ही इंदू मिलची जागा घेतली आणि स्मारक उभे केले.
* रमाकांत जाधव*
भाजपने लंडन येथे स्मारक केले. आज आरक्षित समाज भाजप च्या पाठीशी ठामपणे उभा आहे.कारण प्रधानमंत्री मोदी हे डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांचे विचार पुढे घेवून जातात. त्यांचे सर्व आमदार,खासदार आणि कार्यकर्ते हे आंबेडकरी आणि आरक्षित समाजाला न्याय देत आहेत. त्यामुळे आता आम्ही कोणाच्याही भूलथापांना बळी पडणार नाही. आम्ही भाजप सोबत ठाम राहणार आहोत. कारण काँग्रेसचा खरा चहरा दिसून आला आहे. गेल्या 60 वर्षे सत्ता असताना आमच्या साठी त्यांनी काहीच केले नाही आणि आता आरक्षण संपविण्याचा डाव मांडला आहे तो त्यांचा चालू देणार नाही.