You are currently viewing गाईंची तस्करी करणाऱ्यांना इन्सुलीत रोखले…

गाईंची तस्करी करणाऱ्यांना इन्सुलीत रोखले…

इन्सुलीत गाईंची तस्करी करणाऱ्या गाडीवर बांदा पोलिसांची कारवाई

बांदा

महाराष्ट्र शासनाने गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिल्यानंतर कत्तलीसाठी गो तस्करी करणाऱ्या गाडीवर आज पहाटे इन्सुली खामदेव नाका येथे कारवाई करण्यात आली आहे. ही गाडी देवगडहून कर्नाटकच्या दिशेने जात होती. राज्यमाता जाहिर केल्यानंतर देशी गाईंची तस्करी होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे.

बांदा पोलीस ठाण्यात पुढील कारवाई सुरु आहे. गाईंची तस्करी होण्याची माहिती गो रक्षकांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या मदतीने महामार्गावर इन्सुली खामदेव नाका येथे सापळा रचला होता.गाईंच्या बेकायदा तस्करीमुळे राज्यमातेचा दर्जा देऊनही गाई सुरक्षित नसल्याचे सिद्ध झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा