You are currently viewing पोलीस दलात नोकरीला लावतो असे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या आरोपातून संशयिताची जामिनावर मुक्तता

पोलीस दलात नोकरीला लावतो असे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या आरोपातून संशयिताची जामिनावर मुक्तता

पोलीस दलात नोकरीला लावतो असे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या आरोपातून संशयिताची जामिनावर मुक्तता

ॲड. अशपाक शेख यांचा यशस्वी युक्तीवाद

दिनांक १०/०१/२०२३ रोजी १९.०० वाजता ते दिनांक १२/१२/२०२३ रोजी १४.२५ वाजताचे मुदतीत ओरोस वर्दे रोड, समर्थ नगर, ता. कुडाळ व आंबाली, ता. सावंतवाडी तसेच कोल्हापूर येथे गुन्हा घडला असून सिंधुदुर्गनगरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ४६/२०२४, गुन्हा रजिस्टर नंबर ४६ / २०२४ मधील भा.द.वि. कलम १७०, ४०६, ४१९, ४२० १० अन्वये दिनांक २२/०७/२०२४ रोजी १७.३४ वाजता गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदर कामी विनोद अर्जुन बांदेकर, राहा. ओरोस वर्दे रोड,ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग हे फिर्यादी असून श्री. संदिप बळवंत गुरव, वय सुमारे ४९ वर्षे, धंदा : मोलमजुरी, राहा. संस्कार बंगला, शांती उद्यान, आपटे नगर, ता व जि. कोल्हापूर हे आरोपी आहेत.

गुन्हयाबाबत हकीगत अशी की :- वरील नमूद तारखेस वेळी व जागी यातील आरोपीत याने स्वतः पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करुन फिर्यादी याच्या मुलास पोलीस दलात शिपाई म्हणून व त्यानंतर गुप्त वार्ता विभागामध्ये नोकरीला लावतो असे आमिष दाखवून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन वेळोवेळी फिर्यादी यांचेकडून आंबोली, ओरोस व कोल्हापूर या ठिकाणी रोख स्वरुपात तसेच गुगल पे व चेक स्वरुपात एकूण रक्कम रुपये १६,४७,०००/- एवढी घेवून फिर्यादी यांची फसवणूक केली अशा आशयाची तक्रार फिर्यादी यांनी दाखल केलेली आहे.
सदर कामी आरोपी यांच्या वतीने ॲड. अशपाक शेख यांचा युक्तीवाद ग्राह्य मानून ओरोस येथील मे. मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टात श्रीमती व्ही. आर. जांभोळे यांनी आरोपीची रक्कम रुपये ५०,०००/- च्या जामिनावर मुक्तता केलेली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा