You are currently viewing संतांच्या परंपरेला भजनाच्या माध्यमातून जपण्याचे श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाचे कार्य कौतुकास्पद – ॲड. सुहास सावंत

संतांच्या परंपरेला भजनाच्या माध्यमातून जपण्याचे श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाचे कार्य कौतुकास्पद – ॲड. सुहास सावंत

कुडाळ :

महाराष्ट्र राज्याला सर्वात मोठी संतांची परंपरा लाभली आहे. या संतांच्या परंपरेला भजनाच्या माध्यमातून श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ जपत आहे. ही सर्वात मोठी कौतुकाची बाब असल्याचे ॲड. सुहास सावंत यांनी म्हटले आहे. श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ आयोजित कै. अभय देसाई स्मृती जिल्हास्तरीय भजन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. श्री देव कुडाळेश्वर मंदिरामध्ये ही भजन स्पर्धा सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत आहे हे सुद्धा अभिमानास्पद आहे असे सावंत यांनी सांगितले.

श्री देव कुडाळेश्वर मंदिरात श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ आयोजित कै. अभय देसाई यांच्या स्मृती प्रित्यर्थ जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचा उद्घाटन सोहळा गुरुवारी रात्री संपन्न झाला. यावेळी उद्घाटक व कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड सुहास सावंत, अमेय देसाई विजय देसाई, माजी सरपंच अरविंद शिरसाट, नगरसेवक अभिषेक गावडे, मंडळाचे अध्यक्ष किशोर काणेकर, नारायण राऊळ, ॲड. उमा सावंत, परीक्षक शहाबुद्दीन शेख, संजय दळवी, महेश कुडाळकर, सुरेश राऊळ आदी उपस्थित होते. या स्पर्धेचे यावर्षीचे हे ४९ वे वर्ष असून पुढच्या वर्षी स्पर्धेला ५० वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष होणार आहे. भजन स्पर्धेमध्ये एवढ्या वर्षाचे सातत्य ठेवणे कठीण असून पण हे मंडळ स्पर्धेचे सातत्य राखून आहे. आणि नवीन कलाकारांना वाव मिळत आहे. भजन परंपरा आणि संस्कृती जपण्याचे काम हे मंडळ करीत असूनही कौतुकास्पद आहे असे कार्यक्रमाचे अध्यक्ष सावंत यांनी सांगितले. या कार्यक्रमाची सूत्रसंचालन उदय वेलणकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा