विजयदुर्ग तरळे रस्त्यासाठी 282 कोटीचा निधी, आ. नितेश राणे यांची माहिती
देवगड
गेले कित्येक वर्ष मागणी असलेला विजयदुर्ग तळले या रस्त्यासाठी 282 कोटीची तरतूद करण्यात आली असून यामुळे देवगड मधील पर्यटनाला चालना मिळणार आहे अशी माहिती आज पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे यांनी दिली.
आमदार नितेश राणे यांनी आज देवगड भाजपा कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी देवगड तालुक्याचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या अनेक मंजूर कामांची माहिती त्यांनी दिली.
यावेळी ते म्हणाले की, विजयदुर्गपासून तरळेपर्यंतचा रस्त्याचा मार्ग, ज्याचा विकास जो वर्षानुवर्षे स्थानिकांसाठी एक महत्त्वाचा मुद्दा होता,
हा रस्ता मंजूर झाला असून त्याचा एल.ओ.ए ही झाला आहे. मिळाले आहे, ज्यामुळे काम लवकर सुरू होईल आणि येणाऱ्या काही महिन्यात एक दर्जेदार रस्ता उपलब्ध होईल.
या रस्त्याच्या बांधकामामुळे प्रवास सोप्पा होईल, आणि पर्यटनाला देखील वाव मिळेल, कारण विजयदुर्गच्या दिशेने ये-जा करणारे अनेक लोक या मार्गाचा वापर होतो आहे यामुळे हा रस्ता पर्यटनाला वाव देणार आहे.
या पत्रकार परिषदेत माजी आमदार अजित गोगटे, बाळ खडपे, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम संतोष किंजवडेकर तालुकाधक्ष राजेंद्र शेट्ये, तालुकाध्यक्ष बंड्या नारकर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते