You are currently viewing कर्तेपणाचा त्याग ! देश प्रथम..!!

कर्तेपणाचा त्याग ! देश प्रथम..!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कर्तेपणाचा त्याग ! देश प्रथम..!!*

 

धर्मग्रंथाच्या पत्रावळीत

परंपरागत सांदीफंदीत अडकलो

अंधश्रद्धाच्या फडताळात

जातीपातीच्या डबक्यांत बुडालो

 

वारसाहक्काने आलेल्या भेदभावाने

पिढ्यानपिढ्या दुबळ्या झाल्यात

परकीय आक्रमकां ऐवजी

आपसातच लढत बसल्यात

 

यातून येणारी वेदना दुःख संताप

झटकून टाकता येत नाही

जपावं जरी म्हटलं तरी..हा इतिहास

अंगावर बाळगता येत नाही ..!

 

मग मी ही!कर्मबंधाच्या ठायी

माझ्या कर्तेपणाचा त्याग करतो

अंतर्मुख होवून माझा मीच

स्वतःचीच ओळख टाळतो..!

 

काही धक्के सावरण्यासारखे नव्हते

दुख-या काळजावर फुंकर मारतो

सारी उमेद नव्याने गोळा करून

मी फक्त!माझ्या देशाचा विचार करतो!

आता माफी नाही

आता गद्दारी नाही

देश हाच प्रथम

दुसरं काहीच नाही..!!!

 

बाबा ठाकूर धन्यवाद

प्रतिक्रिया व्यक्त करा