You are currently viewing श्रीगोंदवलेकरमहाराज काव्याचारितावली काव्यपुष्प- ९८ वे

श्रीगोंदवलेकरमहाराज काव्याचारितावली काव्यपुष्प- ९८ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी अरूण वि. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*श्रीगोंदवलेकरमहाराज काव्याचारितावली काव्यपुष्प- ९८ वे*

————————————-

 

नामाचे महत्व सांगितले । पटवूनही ते दिले । महत्व नामाचे

ठसविले । श्रीमहाराजानी जनमानसात ।। १ । ।

 

श्रीमहाराजांनी कितीकदा सांगितले । नाम घेणे हे चांगले ।

होईल तुमचेच भले । शंका निरसन करीती सर्वांचे ।। २ ।।

 

जो जो आला त्यांच्या सहवासात । गोडी निर्माण करिती त्याच्या मनात । विसरावे रे नामात । सदाच सांगती हे

श्रीमहाराज ।। ३ ।।

 

सत्ताधीश तो एक भगवंत । रुजू द्या मनात हेच सत्य ।

गुंतवा मन नामात । आपण आहोत निमित्तमात्र ।। ४ ।।

 

चार मास पंढरपुरात । श्रीब्रह्मानंद असती सहवासात ।

तेणे समाधान चित्तात । त्यांना थांबवती, जाऊ ना देती

श्रीमहाराज ।। ५ । ।

 

एके दिनी ऐसे झाले । कांही संवाद त्या दोघात झाले ।

काय होणार आता पुढे, सुचवले। त्यांना श्री महाराजानी ।। ६ । ।

 

श्रीमहाराजांचे हे निरोपाचे बोल । ब्रह्मानंदांच्या मनी रुतले खोल । ते झाले विषण्ण अबोल । डोळे भरुनी घेती दर्शन जातांना ।।७ । ।

 

श्रीमहाराजांनी पंढरपूर सोडले । परत जाण्यास निघाले ।

अनेकांना घरी पाठवून दिले । थोडे दिवसांनी गोंदवल्यास ते आले.

___________________________

क्रमशः करी लेखन कवी अरुणदास

___________________________

कवी अरुणदास – अरुण वि.देशपांडे- पुणे.

—————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा