You are currently viewing शिस्त आणि विनम्रता त्याच्या संगम : हेमंत काळमेघ

शिस्त आणि विनम्रता त्याच्या संगम : हेमंत काळमेघ

 

 

नागपूरच्या दंत महाविद्यालयातील प्रसंग. हेमंत काळमेघ यांच्या ऑफिस समोरील सभागृहात बरेच प्राध्यापक नागरिक व विद्यार्थी बसलेले होते.. मी जसा सभागृहात प्रवेश केला तसेच हेमंत काळमेघ आपल्या कार्यालयातून बाहेर आले आणि सर्वांसमक्ष वाकून माझ्या पाया लागले. त्यांचे प्राध्यापक भेटायला आलेले नागरिक व दंत महाविद्यालयातील विद्यार्थी पाहतच राहिले. हेमंतराव मला सन्मानाने आतमध्ये घेऊन गेले. त्याचे असे झाले की माझे मित्र श्री मोहन टोंगेसाहेब यांचे हेमंत काळमेघाकडे काम होते. मी हेमंतरावाना फोन केला .ते म्हणाले काका मी दंत महाविद्यालयामध्ये आहे .तुम्हाला येणे शक्य असेल तर या .नाहीतर मी नागपूरला शहरात आल्यानंतर तुम्हाला भेटेल. काम तातडीचे होते म्हणून मी व टोंगेसाहेब दंत महाविद्यालयात पोहोचलो. माझी कार थांबताच एक प्राध्यापक समोर आले .मला म्हणाले आपण प्राध्यापक काठोळे का ? मी हो म्हणताच त्यांच्याबरोबर असलेला दुसरा प्राध्यापक हेमंत काळमेघांच्या कार्यालयात गेला आणि आम्ही सभागृहात प्रवेश करण्यापूर्वीच हेमंतराव माझ्यापर्यंत आले. मी कामाचे स्वरूप सांगतात एका मिनिटात ते काम झाले.

दादासाहेब काळमेघांचा व माझा जुना संबंध.१९७४ पासूनच्या. ते कुलगुरू होण्याच्या आधीपासूनचा. कुलगुरू झाल्यानंतर व पुढे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा माझा खूप घनिष्ठ संपर्क आला. हेमंतरावंनी हे सर्व आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. मी काम सांगितले आणि हेमंतरावांनी केले नाही असे कधी झाले नाही आणि होणारही नाही.

डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न मिळावे यासाठी मी व प्राध्यापक डॉक्टर व्ही टी इंगोले कामाला लागलो.यासाठी मला खऱ्या अर्थाने साथ दिली ती हेमंतरावांनी . भारतरत्न मिळावे म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा ठराव करणे संबंधित लोकांच्या भेटीगाठी घेणे व या कामाला चालना देणे हे सारे हेमंतराव मनापासून करीत आहेत.खरं म्हणजे आज श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा क्रियाशील पदाधिकारी किती चांगले काम करू शकतो याची मूर्तीमंत उदाहरण म्हणजे हेमंत काळमेघ आहेत. भारतरत्नचा विषय जेव्हा निघाला आणि आम्ही कामाला सुरुवात केली तेव्हा पहिला कौल हेमंतरावानी दिला. त्यांच्या अमरावतीच्या निवासस्थानी त्यांनी एक सभा तातडीने बोलावली. अमरावती मधले दिग्गज पंधरा मिनिटात आलेत. कार्यक्रमाची नियोजन झाले. पंतप्रधानांना कोणी भेटायचे गृहमंत्र्यांना कोणी भेटायचे मोहन भागवतांना कोणी भेटायचे मुख्यमंत्र्यांना कोणी भेटायचे. उपमुख्यमंत्र्यांना कोणी भेटायचे. राज ठाकरेंना कोणी भेटायचे .त्याची रूपरेषा ठरली. हेमंतरावांनी मला स्पष्टच सांगितले काका पैशाची काळजी करू नका. विमानाची तिकिटे मी काढतो. मी तुमच्याबरोबर होतो आहे आणि राहीलही. मी जायला निघालो तेव्हा त्यानी हात धरून मला बसवले आणि म्हणाले काका तुम्ही माझ्याकडे पहिल्यांदाच आलेले आहात. जेवण करून जा. मला या ठिकाणी हेमंतरावामध्ये दादासाहेब काळमेघ असल्याची जाणीव झाली. दादासाहेबांनी देखील मला कधी जेवण केल्याशिवाय घरी जाऊ दिले नाही.जेवण केल्यानंतर हेमंतरावांनी मला घरापर्यंत सोडले. मी हेमंतरावांना दादासाहेबांच्या कालखंडापासून पाहत आहे. काही वेळेस हेमंतरावांनी मला भरपूर मदत केलेली आहे आणि आजही ते करीत आहे. त्यांचा हा माझा ऋणानुबंध लोकांना माहीत आहे. मागे नागपूर वरून आमच्या परिवारातील श्रीमती ममता मून यांचा फोन आला. त्यांची मुलगी हेमंतरावांच्या दंत महाविद्यालयात होती. पैशाची अडचण होती.परीक्षा जवळ आली होती . क्लिअरन्स केल्याशिवाय हॉल तिकीट कुठेच मिळत नाही. स्थगित रक्कम मोठी होती. ममता मून मॅडमनी मला विनंती केली. मी हेमंतरांना फोन केला. हेमंतराव म्हणाले काका त्या मुलीला कॉलेजमध्ये आजच पाठवा. आजच्या आज प्रवेश पत्र मिळून जाईल. राहिला प्रश्न फिसचा. तो मी पाहून घेईन . केवढी ही उदारता व निर्णयक्षमता. दादासाहेबांच्या एका अटीतटीच्या प्रसंगी मी दादासाहेबांना खूप मोठी साथ दिली .हेमंतराव त्याचे साक्ष आहेत. मला आठवतंय. दादासाहेब अध्यक्ष असताना श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे वातावरण कसे होते ? मी दादासाहेबांचा प्रचंड मोठा सत्कार घेण्याचे ठरवले. प्राचार्य भा वा चौखंडे प्राचार्य एकनाथ गावंडे माझ्या मदतीला आले. दादासाहेब काळमेघाचे प्रचंड मोठे कार्यक्रम झाले असतील. परंतु या कार्यक्रमासारखा कार्यक्रम दुसरा झाला नाही. लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि दादा साहेबांना आपला पाठिंबा व्यक्त केला. त्यांच्या विरोधकांचे धाबे दणाणले.

डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न प्राप्त व्हावे यासाठी आम्ही सहयाची मोहीम राबवली. हेमंतराव म्हणाले. डॉक्टर पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या परिवारातील रजनीताई देशमुख यांची आपण सही घेऊ या. त्या भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या पुतणी लागतात. मी हेमंतरांना म्हटले मला पत्ता द्या .मी जाऊन येतो. हेमंतराव म्हणाले काका तुम्ही घरीच थांबा. मी घ्यायला येतो. आपण मिळून जाऊ. हेमंतराव केवळ रजनीताईंची सहीच घेऊन थांबले नाही तर आम्ही तयार केलेल्या सह्यांच्या पुस्तकांवर जवळपास तीनशे सह्या घेण्याचे काम त्यांच्या माध्यमातून झाले. त्यांची काम करण्याची पद्धत अचूक निर्णयक्षमता पाहण्यासारखी आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोणतेही काम असले तर मी हेमंतरांवना फोन करतो.ते म्हणतात काका नागपूरला येण्याची गरज नाही. मी उद्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेत येतच आहे. तुम्ही कार्यालयात या.तुमचे काम झाले म्हणून समजा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती दिलेली वेळ पाळतात.. विलंब करीत नाहीत. दादासाहेबाचे दुःखद निधन झाल्यानंतर त्यांचा स्मृतिदिन सप्ताह साजरा करण्याचे ठरविले. हेमंतराव तेव्हा संस्थेत नव्हते. पूर्ण सप्ताहाची जबाबदारी त्यांनी माझ्यावर दिली .संपूर्ण खर्च एकट्याने केला. सात दिवस आलेल्या पाहुण्यांचे आगत स्वागत त्यांनी स्वतः लक्ष देऊन केले. त्यामध्ये हेमंतरावांनी आपले मन ओतले आहे. त्यामुळे स्मृती दिनाचा हा कार्यक्रम सर्वांच्या दीर्घकाळ लक्षात राहतो. त्यांच्या रूपाने श्री शिवाजी शिक्षण संस्थेला एक कर्तव्यदक्ष कार्य तत्पर विनम्र आणि शिस्तप्रिय कार्यकारी सदस्य मिळाला. खऱ्या अर्थाने भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि दादासाहेब काळमेघ यांचा वारसा ते पुढे नेत आहेत.अशा या व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…!

प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आयएएस

डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी

अमरावती कॅम्प 9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा