सावंतवाडी :
बांदा विकास सोयायटीच्या वतीने देण्यात येणारा आदर्श शेतकरी पुरस्कार प्रगतशील बागायतदार राजाराम मावळणकर यांना प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत यांच्या अध्यक्षतेखाली विकास सोसायटीची ९३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (कै.) माधव हरी अळवणी सभागृहात पार पडली. या सभेला संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्ष संजय चांदेकर, संचालक घनश्याम बांदेकर, आदम आगा, लक्ष्मण सावळ, भिकाजी धुरी, आबाजी देसाई, सुभाष परब, अर्चना आंबेलकर, कामिनी कुडव, देऊ मळगावकर, लक्ष्मण जाधव, सचिव सौ. मयुरी परब, कर्मचारी प्रकाश बांदेकर, विनया गवस, सुनीता कांबळे, कीर्ती धुरी आदिसह संस्थेचे सभासद उपस्थित होते.सचिव सौ. परब यांनी इतिवृत्त वाचन केले. यावेळी वार्षिक अहवालवार चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. उद्योजक नितीन मावळणकर यांनी संस्थेला साउंड सिस्टीम भेट दिल्याबाबत आभार मानण्यात आले.
संस्था अध्यक्ष श्री सावंत यावेळी म्हणाले कि, शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कर्जाची शेतीपूरक व्यवसायासाठी उचल करून वेळेत फेडून संस्थेच्या भरभराटीस हातभार लावावा. येत्या काही वर्षात आपणाला शतक महोत्सव साजरा करायचा आहे. बँक पातळीवर शंभर टक्के वसुली केल्याबद्दल सभासदांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून कर्मचारी वर्गांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला.