आर.पी.आय.(आठवले) पक्षाचा कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीराचे आयोजन 20 ऑक्टोबर ला
सावंतवाडी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्षाचा युवक, युवती,महिला तसेच पक्ष कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर येत्या रविवार दि. 20 ऑक्टोबर 2024 रोजी सावंतवाडी येथील मँगो हॉटेल हॉल मध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष -अजीतकुमार कदम याने दिली.
नुकतीच पक्षाची बैठक पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव-मा..रमाकांत जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व अजीतकुमार कदम यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल मँगो मध्ये संपन्न झाली. पक्ष वाढीसाठी तसेच पक्षाची आगामी भुमिका शिबीरात मांडली जाणार आहे,पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री -मा.नाम.रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या आदेशाने पक्ष चळवळ अधिक मजबूत करण्याच्या हेतूने शिबीर आवश्यक असल्याची भूमीका रमाकांत जाधव यांनी बैठकीत मांडली.
शिबीरात राज्यस्तरीय पक्ष नेते उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.बैठकीत पक्षाचे कोकण विभाग चे सहसचिव-शंकर जाधव (उसपकर),जिल्हा कार्याध्यक्ष -सखाराम कदम,सावंतवाडी तालूका अध्यक्ष-संतोष जाधव,कुडाळ तालूकाध्यक्ष- सतीश कदम,कणकवली तालूकाध्यक्ष- एस.के.तांबे,अरूण कदम,वेैभववाडी तालूकाध्यक्ष-रविंद्र जंगम,दोडामार्ग तालुका कार्याध्यक्ष -प्रेमानंद पालेकर,तालूका उपाध्यक्ष-सत्यवान पालयेकर,दिपक कदम यांसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
______________________________
*संवाद मीडिया*
🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡
*प्रॉपर्टी विकणे आहे*
*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*
https://sanwadmedia.com/148054/
*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*
*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*
*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*
*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*
*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈
*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*
*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*🔍
*जाहिरात लिंक*
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*