You are currently viewing घावनळेत ८ ऑक्टोबरला जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा 

घावनळेत ८ ऑक्टोबरला जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा 

कुडाळ :

 

घावनळे येथील नमसवाडी युवक व ग्रामस्थ मंडळाच्यावतीने नवरात्रौत्सवानिमित्त मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी रात्री ८.०० वाजता जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा लहान गट व मोठा गट अशा दोन गटात होणार आहे.

या स्पर्धेसाठी मोठ्या गटासाठी प्रथम क्रमांक ५०००/- रुपये व चषक, द्वितीय क्रमांक ३०००/- रुपये व चषक, तृतीय क्रमांक २०००/- रुपये व चषक तर लहान गटासाठी प्रथम क्रमांक ३०००/- रुपये व चषक, द्वितीय क्रमांक २०००/- रुपये व चषक, तृतीय क्रमांक १०००/- रुपये व चषक अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तसेच स्पर्धेतील सहभागी सर्व स्पर्धकांसाठी चषक व प्रमाणपत्र आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील इच्छुक स्पर्धकांनी राजकुमार घावनळकर ९४२१४१६८९४ आणि मायकल फर्नांडिस ९९२३०३९५४७ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन नमसवाडी युवक व ग्रामस्थ मंडळाने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा