*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आजही ते फुलपाखरू येतं..!!*
सवयीच्या मातीत उगवतोस
अंधारात निघून जातो
आजही फुलपाखरू येतं
तुझा पत्ता विचारतो..
उत्कट तुझ्या देव्हा-यात
आकाश उगवून येत
ज्योत विझण्याच्या प्रहराला
ताम्हण तुझं प्रकाशतं..
फुलपाखरू पूजा सोसून
अंगण सारवल्यासारखं करत
कुठे जातोस….रे..सोडून
फुलणं ह्दयांत जपतं..
परका होतोय माझा ….मी
ईश्वराला तुझ्यामाझ्यात घेऊ…नकोस
देहाची कापूरहोळी जाळलीस
अग्निशिखांतून आहुति घेऊ..नकोस
बागेचं राखणदार ते
फुलपाखरू आजही येत
तुझा पत्ता विचारत
खांद्यावर येऊन बसतं…
बाग आहे तुझी
फुलं आहेत माझी
जगणं मरणं इथेच
काळजी घेतो तुझी..!!
दूर उडून जातं
खांद्यावर येऊन बसतं
बागेचं मालक आहे ..ते..!
ईश्वरासोबत देव्हा-यात राहतं..
बाबा ठाकूर धन्यवाद