कणकवली नगरपंचायत पथविक्रेता समितीवर भाजपाचे वर्चस्व – समीर नलावडे
कणकवली
कणकवली नगरपंचायत पथविक्रेता समितीची निवडणूक नुकतीच झाली. या निवड प्रक्रियेत फॉर्म मागे घेण्याचा काल अंतिम दिवस होता. या समितीच्या आठ पैकी सात जागांवर भाजपाचे पॅनल बिनविरोध विजयी झाले आहेत. तर एक जागा रिक्त राहिली आहे अशी माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
कणकवली शहर भाजपा कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगरसेवक विराज भोसले, कंझुमर सोसायटी चेअरमन संदीप नलावडे, गौरव हर्णे, सागर होंडावडेकर आदी उपस्थित होते. या निवडणुकीत सागर होंडावडेकर, हरेश ढवण, संजय परब, हनुमंत तेंडुलकर, सान्वी गावडे, शबिना मकतुमसाबा दोडमणी, सूर्यकांत ठाकर यांची बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती नलावडे यांनी दिली. तसेच आज सायंकाळी आमदार नितेश राणे यांच्याहस्ते बिनविरोध आलेल्या समिती सदस्यांचा सत्कार होणार असल्याचे ते म्हणाले.